महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निमंत्रण पत्रिकेत भाजप खासदाराचे नाव नसल्याने कार्यकर्ते संतप्त, शिक्षणाधिकाऱ्यांना दिला वाण - स्नेहसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप खासदाराचे नाव नसल्याने कार्यकर्ते नाराज

जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमंत्रण  पत्रिकेवर भाजप खासदाराचे नाव नसल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी आणि  मुख्याध्यापिकेला मकर संक्रांतीला वाटला जाणारा वाण दिला.

Bjp workers agitation against Zilha prishad school in bhandara
निमंत्रण पत्रिकेत भाजप खासदाराचे नाव नसल्याने कार्यकर्ते संतप्त

By

Published : Jan 20, 2020, 1:42 PM IST

भंडारा - जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप खासदाराचे नाव नसल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापिकेला मकर संक्रांतीला वाटला जाणारा वाण दिला. शाळेसारख्या पवित्र मंदिरातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक राजकारण करत असल्याचा आरोप भाजप कार्यकत्यांनी केला आहे.

निमंत्रण पत्रिका बदलावी अन्यथा स्नेहसंमेलन होऊ देणार नाही असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे. भंडारा शहरात असलेली सर्वात जुनी लालबहाद्दूर शास्त्री जिल्हा परिषद शाळेत 23, 24 आणि 25 जानेवारीला स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने छापलेली निमंत्रण पत्रिका म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीचा मेळावा आहे की काय असे पत्रिका वाचल्यावर वाटते. कारण या पत्रिकेवर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षापासून तर काँग्रेस राष्ट्रवादीचे लहान-मोठे सर्वच नेत्यांची नावे आहेत. मात्र, भंडारा-गोंदियाचे पहिले नागरिक असलेले खासदार सुनील मेंढे तसेच भंडारा पंचायत समितीचे अध्यक्ष यांचे नाव मुद्दाम डावलण्यात आले असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

निमंत्रण पत्रिकेत भाजप खासदाराचे नाव नसल्याने कार्यकर्ते संतप्त

कार्यक्रम पत्रिका भाजप कार्यकर्त्यांच्या हातात पडताच हे कार्यकर्ते एकत्रित लालबहादूर शास्त्री शाळेत पोहोचले. मात्र, प्राचार्य उपस्थित नसल्याने आपले निवेदन येथील शिक्षकांना देत प्राचार्याच्या टेबलांवर वान ठेवण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा शिक्षणाधिकारी यांच्या दालनात पोहोचला. तिथे शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शाळेच्या प्राचार्यांनी कोणती चूक केली हे दाखवून दिली. केवळ जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने त्यांच्याच नेत्यांना निमंत्रण पत्रिकेत नाव छापले आहेत. ही मुद्दाम केलेली घोडचूक दुरुस्त करावी, अशी मागणीही यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केली. काँग्रेसला चमचा आणि राष्ट्रवादीला खुळखुळा वान म्हणून दिला. छापलेली निमंत्रण पत्रिका रद्द करून नवीन पत्रिकेमध्ये खासदार सुनील मेंढे, पंचायत समिती अध्यक्ष यांच्या नावाचा उल्लेख न झाल्यास स्नेहसंमेलन होऊ देणार नाही अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणासुद्धा घाणेरडे राजकारण होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही हे आंदोलन केले असल्याचे प्रशांत खोब्रागडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details