भंडारा - पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी येत्या ११ तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी भंडारा-गोंदिया मतदारंसघाचे भाजप उमेदवार सुनिल मेंढे गावागावात जाऊन लोकांशी थेट संवाद साधत आहेत. कुठले महत्त्वाचे मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जाणार आहेत? याबाबत त्यांच्यासोबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी केलेली चर्चा...
मोंदींच्या योजना भाजपसाठी जमेची बाजू - सुनिल मेंढे - भंडारा-गोंदिया मतदारंसघ
भाजप शासनाच्या काळात शैचालय बांधण्याची कल्पना उदयास आली, उज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांना गॅस देण्यात आली, प्रत्येक घरात वीज दिली, लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे देणे, कामगार योजनेच्या माध्यमातून नोंदणी करणे अशा अभूतपूर्व योजना ही भाजपची जमेची बाजू असल्याचे मेंढे म्हणाले.

मोदी सरकारने केलेल्या या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचाच फायदा आम्हाला होणार आहे. मोदींनी केलेल्या कामामुळेच निवडून येणार असल्याचे ते म्हणाले.
निवडून आल्यानंतर पहिल्यांदा गोसेखुर्द प्रकल्पाचे काम पूर्ण करून सिंचनाची व्यवस्था करणार. तसेच नागपूर-भंडारा हा ६ पदरी रस्ता होत. आहे. त्याअनुषंगाने शहरालगत नवीन उद्योग सुरू करणार असल्याचे मेंढे यांनी सांगितले.