भंडारा -विधान परिषदचे आमदार परिणय फुके यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेताच भंडारा भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी कार्यकर्त्यांसह फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.
परिणय फुके राज्यमंत्री बनल्याने भंडारा भाजपतर्फे जल्लोष
भंडारा गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे आणि परिणय फुके यांचे ही निकटवर्तीय संबंध आहेत.त्यामुळे फुके यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेताच मेंढे यांनी कार्यकर्त्यांसह फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला.
परिणय फुके (३८) हे मूळचे नागपूरचे असून त्यांचे शिक्षण बी ई इलेक्ट्रॉनिक आणि पीएचडी झाले आहे. त्यांनी २००७ साली राजकारणाला सुरूवात केली होती. वयाच्या २६ व्या वर्षी पहिल्यांदाच नागपूर महानगर पालिकेत निवडून गेले होते. २०१६ साली भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी त्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आणि ती त्यांनी सार्थक ठरवून राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांना पराभूत केले. ते मुख्यमंत्रांचे विश्वासू म्हणून परिचित आहेत.
भंडारा गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे आणि परिणय फुके यांचे ही निकटवर्तीय संबंध आहेत. त्यामुळेच आज रविवार असूनही ते नगर परिषदमध्ये आले आणि त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावून फुके यांनी शपथ घेताच गांधी पुतळ्या समोर फटाके फोडले. गांधीजींच्या प्रतिमेला हार चढवून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.