भंडाऱ्याचा पारा 46 डिग्रीवर, काही दिवसात मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता - maharashtra
भंडाऱ्याचे कमाल तापमान 46 वर पोहोचले असून पुढचे काही दिवस नागरिकांना उष्णतेचे चटके सहन करावे लागणार आहेत. येत्या तीन दिवसात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भंडारा - भंडाऱ्याचे कमाल तापमान 46 वर पोहोचले असून उन्हाच्या तडाख्याने भंडारा जिल्ह्यातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढचे काही दिवस नागरिकांना उष्णतेचे चटके सहन करावे लागणार असून येत्या तीन दिवसात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
संपूर्ण विदर्भामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे. मे महिन्याच्या शेवटी सूर्य जेव्हा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवसांची सुरुवात 25 मे पासून झाली आहे. तर ते 3 जूनला संपणार आहे.