भंडारा- कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे, त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावे. हनुमान जयंतीसाठी नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन भंडारा पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हिडीओ बनवला आहे.
हनुमान जयंतीसाठी घराबाहेर पडू नका, भंडारा पोलिसांचे आवाहन
भंडारा शहर पोलीस निरीक्षक यांनी हनुमान मंदिरांच्या दोन प्रमुखांना घेऊन एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओद्वारे सध्या मंदिरे बंद आहेत, कोणीही मंदिरात येऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे.
भंडारा शहर पोलीस निरीक्षक यांनी हनुमान मंदिरांच्या दोन प्रमुखांना घेऊन एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओद्वारे सध्या मंदिरे बंद आहेत, कोणीही मंदिरात येऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे.
भंडारा शहर पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक लोकेश कानसे यांनी शहरातील प्रसिद्ध भृशुंड गणेश मंदिर मेढाचे व्यवस्थापक प्रवीण मोहरील आणि मोठा बाजार हनुमान मंदिराचे सचिव संजय एकापूरे यांना सोबत घेऊन व्हिडीओ बनवून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यामध्ये कोणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.