भंडारा- ज्याप्रमाणे सिगारेटच्या पाकिटावर धोकादायक असल्याचे चिन्ह असते तसेच चिन्ह आता संपूर्ण भंडारा शहरातील चौकात दिसत आहेत. तसेच नागरिकांना आपण खरंच कामासाठी घराबाहेर पडताय का ?, असा प्रश्न विचारणारा संदेशही मोठ्या अक्षरात रस्त्यावर लिहिले आहेत. टाळेबंदीच्या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरणे बंद करावे, यासाठी भंडारा नगर परिषदने ही नवीन शक्कल लढवली आहे.
संचारबंदीच्या काळात विनाकारण शहरात भटकंती करणाऱ्या नागरिकांनी घरीच राहावे यासाठी कधी कायदेशीर तर कधी दंडात्मक कारवाई गेली. मात्र, तरीही नागरिकांनी घराबाहेर निघणे बंद केले नाही. यावर उपाय म्हणून भंडारा नगर पालिकेच्या मुख्यधिकारी यांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये नागरिकांसाठी प्रश्नार्थक संदेश लिहून घेतले. सबोतच धोक्याचा चिन्ह ही या संदेशासह काढून घेतला. आपण खरच कामासाठी घराबाहेर पडताय का?, विनाकारण फिरत असाल तर कुटुंब व शहराला धोक्यात आणत आहात. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि इतरांना सुरक्षित ठेवा. पोस्ट ऑफिस चौक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, अशा प्रमुख चौकात संदेश विनाकारण टवाळक्या करत फिरणाऱ्यांसाठी लिहिले गेले आहेत.