भंडारा -शहरातील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची असते. मात्र भंडारा नगरपालिका ही स्वतः अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली आहे. एवढंच नाही तर शहरातील मुख्य मार्गावर लाखो रुपये खर्च करून सिमेंटच्या रस्त्यावर डबल सिमेंट चा रस्ता बांधून ही या रस्त्यांवर भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांचा कब्जा असल्याने हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहे. मात्र नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडून अतिक्रम काढण्याचा कधीही प्रयत्न केला जात नाही.
चारचाकी आणि दुचाकीचा आवगमान कमी असल्यामुळे हा सिमेंटीकरण रस्ता अगदीच सुव्यवस्थित होता. मात्र तरीही दोन महिने पहिले या सुव्यवस्थित रस्त्यावर भंडारा नगरपालिकेने पुन्हा एक सिमेंट करण्याचा एक कोटी चा रस्ता बनविला. त्यानंतर तरी हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होईल अशी अपेक्षा होती. मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून या सिमेंट करण्याच्या रस्त्यांवर भाजी विक्रेते आणि फळविक्रेते बसतात. विशेष म्हणजे या रस्त्याच्या सुरूवातीलाच वाहतूक नियंत्रण शाखेचे ची इमारत आहे. तसेच पोस्ट ऑफिस ही आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहतूक शाखेच्या लोकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र नियमानुसार वाहतूक शाखेचे लोक या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करू शकत नसल्याने त्यांना निमूटपणे हा सर्व तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहावा लागत आहे.
भाजी विक्रेत्यांसाठी शासनाने सिमेंटचे ओटे बनवून दिले-
मुख्य रस्त्यांवर येऊन रस्ता रहदारीसाठी बंद करणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी शासनाने सिमेंटचे ओटे बनवून दिलेले आहे. जवळपास शंभर ओटे अजूनही खाली आहेत. या सर्व भाजी विक्रेत्यांनी फळविक्रेते बसल्यास रहदारी साठी असलेले हे मार्ग खुले होतील. या ओट्यावर अजूनही काही विक्रेते त्यांचा व्यवसाय करतात. 1980 मध्ये त्यांची निर्मिती केली गेली होती. तेव्हा सर्व व्यापार हा तिथेच व्हायचा. मात्र मागील काही वर्षांपासून भाजीविक्रेते हळूहळू करून रस्त्यावर येऊन बसायला लागले. सुरुवातीला एक दोन लोकांनी रस्त्यावर भाजीविक्री तिचा काम सुरू केला आणि आता पाहता पाहता संपूर्ण रस्त्यावर यांचाच कब्जा असतो. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे लक्ष देत नसल्यानेच हा अतिक्रमण होत असल्याचा आरोप हे विक्रेते करीत आहेत. शासनाने या सर्व विक्री त्यांना आत मध्ये बसण्याचे आदेश काढले तर हा मार्ग सर्वांसाठी पुन्हा एकदा मोकळा होईल असे मत आत मध्ये बसलेल्या विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
अतिक्रमण काढताना पालिकेचे अजब धोरण-
नुकतेच भंडारा नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती या मोहिमेअंतर्गत पक्के बांधकाम असलेल्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोर देखाव्याच्या वस्तू ठेवल्यास किंवा लोखंडी रॉड लावून शेड तयार केल्यास ती हटवण्याचे काम पार पाडले. पोस्ट ऑफिस चौकापासून असलेल्या रस्त्यावर ही हे अतिक्रमण हटाव दस्ता पोहोचला. मात्र केवळ लोखंडी रॉड तोडून अतिक्रमण हटाव मोहीम फत्ते झाली. मात्र तिथे असलेल्या टपऱ्या, ठेले, भाजीविक्रेते, फळविक्रेते यांचा अतिक्रमण मात्र नगरपालिकेला दिसला नाही. त्यामुळे अतिक्रमण म्हणजे नेमकं काय आणि कसा असतो असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
या विषयी मुख्याधिकारी यांना याविषयी विचारले असता मला नेमके ओटी किती, उर्वरित भाजी विक्रेते किती याची जाणीव नसल्याने मी आत्ताच काही बोलू इच्छित नाही. मात्र एप्रिल महिन्यानंतर हे अतिक्रमण हटविण्याचे काम करू असेही त्यांनी सांगितले. खरं तर हे अतिक्रमण मागील दहा वर्षापासून सुरू आहे. किती तरी वेळा अतिक्रमण हटाव मोहिम झाली. मग तेव्हा तुम्हाला अतिक्रमण दिसला नाही का असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय. जर नगरपालिकाच स्वतः अतिक्रमणाच्या विळख्यात असेल तर शहरातील अतिक्रमण संपेल कसा ? त्यामुळे या बातमीनंतर तरी प्रशासनाच्या या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून हे रस्ते सर्वसामान्य नागरिकांसाठी उघडे करावे एवढीच अपेक्षा नागरिक करीत आहेत.
हेही वाचा-कन्नड रक्षण वेदिकेच्या आंदोलनाला शिवसेनेचे चोख प्रत्युत्तर; कर्नाटकची बस वाहतूक रोखली