महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा नगरपरिषदेत भाजपवर एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा ओढावली पराभवाची नामुष्की - भाजपचा निवडणूक पराभव

भंडारा नगरपरिषदेत 14 फेब्रुवारीला सहा विभागांच्या सभापती पदाच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती पदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री बोरकर आणि भाजपच्या ज्योती हरीश मोगरे यांच्यात निवडणूक झाली. यावेळी सभागृहात बहुमत असूनही भाजपच्या ज्योती मोगरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Bhandara Municipal Council
भंडारा नगरपरिषद

By

Published : Feb 15, 2020, 6:22 AM IST

भंडारा - शुक्रवारी भंडारा नगरपरिषदेमध्ये झालेल्या विभागीय सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या चक्क दोन नगरसेवकांनी आणि भाजपचे समर्थन असलेल्या एका अपक्ष नगरसेवकाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उघडपणे समर्थन दिले. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

भंडारा नगरपरिषदेत भाजपवर एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा ओढावली पराभवाची नामुष्की...

भाजपमध्ये पुन्हा बंडखोरी झाल्याने एकाच आठवड्यात भाजपला दोन वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला यापेक्षा मोठे भूकंपाचे हादरे लागतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. उपाध्यक्ष आणि सभापती यांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपयशाची सर्वस्वी जबाबदारी ही नगराध्यक्ष आणि खासदार सुनील मेंढे यांची आहे. त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दबक्या आवाजात भाजपच्या नगरसेवकांकडून होत असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा...'वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा'

भंडारा नगरपरिषदेत 14 फेब्रुवारीला सहा विभागांच्या सभापती पदाच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री बोरकर आणि भाजपच्या ज्योती हरीश मोगरे यांच्यात महिला व बालकल्याण सभापती पदाकरीता निवडणूक झाली. यात जयश्री बोरकर यांना ८ मते प्राप्त झाली तर भाजपच्या ज्योती मोगरे यांना ३ मते प्राप्त झाली. त्यामुळे मोगरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश ठाकरे व भाजपच्या भुमेश्वरी बोरकर यांच्यात लढत झाली, त्यात उमेश ठाकरेला ६ मते व भुमेश्वरी बोरकर यांना ५ मते मिळाली. त्यामुळे तिथेही भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. नगरसेवक आशु गोंडाणे - नियोजन , मधुरा मिलींद मदनकर - पाणी पुरवठा, शमीमा शेख - शिक्षण, तसेच दिनेश भुरे - बांधकाम विभागाचे सभापती हे सर्व बिनविरोध निवडणुन आले आहेत. परंतु भंडारा नगरपरिषदेत 33 पैकी भाजपचे 15 सदस्य आणि 3 अपक्षांचा पाठिंबा आहे. असे असतानाही भाजपला पराभव पहावा लागला.

भाजप नगरसेवकांनी उघडपणे विरोधीपक्षाला मदत केल्याने नगराध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नगराध्यक्षांचे भाजप नगरसेवकावर कोणतेही अंकुश नसल्याचे घडलेल्या प्रकारावरुन लक्षात येत आहे. त्यामुळे त्यांनी आता तरी त्यांची नैतिक जबाबदारी समजून घ्यावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवकांतर्फे केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा...ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: आता लखमापूर गावही पांघरणार उजेड, गावातच होईल मोबाईल चार्ज

ABOUT THE AUTHOR

...view details