भंडारा - राज्य सरकारने लावलेल्या लॉकडाऊन विरोधात भंडारा जिल्ह्यातील व्यापारी आक्रमण झाले आहे. शहरातील व्यापारी लॉकडाऊन विरोधात रस्त्यावर आले आहे. शहरातील मुख्य चौक असलेल्या गांधी चौकात मोठ्या संख्येने व्यापारी एकत्रित होत लॉकडाऊन विरोधात निर्दशने केले आहे. आम्हांला आधी सुविधा द्या मग खुशाल लॉकडाऊन करा, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
गांधी चौकात केली निदर्शने
मंगळवारी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन विरोधात आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे आंदोलन पाहून भंडारा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही जिल्ह्याच्या गांधी चौकात निदर्शने करून शासनाचा निषेध केला.