भंडारा - शेतकरी व सामान्य माणूस यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून आपण स्वतः या विषयावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम म्हणाले. तसेच भातपीक खरेदी केंद्र वाढविण्याबाबत पाच दिवसात सकारात्मक अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद सभागृहामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
भातपीक उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - विश्वजीत कदम
भंडारा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांची कामे त्वरित व्हावी त्यादृष्टीने यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचार खपवून घेतले जाणार नाही. भ्रष्टाचाराच्या तक्रारी मिळाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री विश्वजीत कदम म्हणाले.
पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम हे भंडाऱ्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी कामाचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्हा नियोजन समितीने सादर केलेल्या सन 2020- 21 च्या 153 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास तसेच 2019 -20 च्या खर्चास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रारूप आराखडा 2020-21 मध्ये कार्यवाही यंत्रणेकडून एकूण रक्कम 32, 117.67 लक्ष रकमेचे प्रस्ताव प्राप्त झाले असून शासनाने ठरवून दिलेल्या रुपये 15308.63 कमाल मर्यादेच्या प्रस्तावांना मान्यता प्रदान केलेली आहे. उर्वरित 16 हजार 808 लक्ष एवढी रक्कम अतिरिक्त मागणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांची कामे त्वरित व्हावी त्या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचार खपवून घेतले जाणार नाही. भ्रष्टाचाराच्या तक्रारी मिळाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात भंडारा जिल्हा खरच भ्रष्टाचार मुक्त होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.