महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांना विजयाची शाश्वती - सुनील मेंढे

एक्झिट पोलवर सत्ताधारी भाजपचा वर्चस्व असल्याने माध्यमांनी कशाही पद्धतीने अंदाज दाखवून भाजपला विजय दाखवत आहे. असे असले तरी निकालानंतर हे अंदाज खोटे ठरणार असल्याचे नाना पंचबुद्धे यांनी म्हटले आहे. तर एक्झिट पोल अंदाजानुसार आमची सत्ता येईल आणि भंडारा गोंदियामधूनही भाजप निवडून येईल, असे सुनील मेंढे यांनी म्हटले आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांना विजयाची शाश्वती

By

Published : May 21, 2019, 3:19 PM IST

भंडारा- खासदारकीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी २३ तारखेला होणार आहे. या निवडणुकीत आमचा विजय होईल, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना आहे. एक्झिट पोलचे अंदाज हे खरे ठरत नाही. या अंदाजांवर सत्ताधारी पक्षाचा प्रभाव असल्याने आम्ही हा निकाल मान्य करत नसल्याचे नाना पंचबुद्धे यांनी सांगितले. तर एक्झिट पोल अंदाजानुसार आमची सत्ता येईल आणि भंडारा गोंदियामधूनही भाजप निवडून येईल असे सुनील मेंढे यांनी म्हटले आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांना विजयाची शाश्वती

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला भंडारा-गोंदिया मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण १४ उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत ही राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे आणि भाजपचे सुनील मेंढे यांच्यातच आहे. ११तारखेला झालेल्या मतदान ६८.२७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. १२,३४, ५६७ मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य ठरवले आहे. तब्बल ४२ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर २३ तारखेला निकाल लागणार आहे. या ४२ दिवसात या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मतांची जी गोळाबेरीज केली आहे त्यानुसार त्यांचा उमेदवार जिंकेल असा विश्वास आहे.

याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी सांगितले, की आम्ही दोन्ही जिल्ह्यात भरपूर मतदान घेतला असून सर्वच जातीतील, धर्मातील, सर्व क्षेत्रातील मतदारांनी आमच्या बाजूने मतदान केलेला आहे. तसेच २०१४ मध्ये भाजपने लोकांना आणि शेतकऱ्यांना शेतीविषयी, रोजगाराविषयी जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता केली नाही. याउलट २००९ पर्यंत आघाडीच्या सरकारमार्फत लोकाभिमुख भरपूर काम झाले. त्यामुळे या खोट्या भाजप सरकारवर लोकांचा विश्वास उरला नसल्याने या निवडणुकीत मतदारांनी आमच्या बाजूने मतदान केलेला आहे. त्यामुळे ती निवडणूक मीच जिंकणार, असा विश्वास यावेळी नाना पंचबुद्धे यांनी दाखविला आहे.

एक्झिट पोलमध्ये दाखविले गेलेले अंदाज खोटे ठरणार आहेत. कारण एक्झिट पोलचा अंदाज नेहमीच चुकीचा ठरतो. एक्झिट पोलवर सत्ताधारी भाजपचा वर्चस्व असल्याने माध्यमांनी कशाही पद्धतीने अंदाज दाखवून भाजपला विजय दाखवत आहे. असे असले तरी निकालानंतर हे अंदाज खोटे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांनीसुद्धा स्वतःच्या विजयाबद्दल खात्री दर्शविली आहे. लोकांना एक स्थिर सरकार हवे होते. मागच्या पाच वर्षात भाजपने मोदी यांच्या नेतृत्वात जे कार्य केले त्याला प्रतिसाद देत लोकांनी पुन्हा यावेळेस भाजपवर विश्वास ठेवत आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे कमीत कमी ५० हजारपेक्षा जास्त मतांनी आम्ही निवडून येणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, ते आज मुंबईमध्ये भाजपच्या बैठकीसाठी उपस्थित झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details