भंडारा - बहुजन समाज पक्षाने भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघातुन यावेळी महिला उमेदवार डॉ. विजया राजेश नांदुरकर (ठाकरे ) यांना रिंगणात उतरविले आहे. बसपने पहिल्यांदा ओबीसी महिलेला संधी दिलीआहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघ - बसपकडून डॉ. विजया नांदुरकर यांना उमेदवारी - उमेदवारी
डॉ. विजया नांदुरकर यांनी गेल्या २ वर्षापुर्वी झालेल्या पवनी नगरपरिषदेच्या निवडणुक रिंगणातही नगराध्यक्षपदासाठी बसपकडून निवडणुक लढविली होती.
डॉ. विजया नांदुरकर
पवनी येथील डॉ. विजया राजेश नांदुरकर (ठाकरे) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. विजया नांदुरकर यांनी गेल्या २ वर्षापुर्वी झालेल्या पवनी नगरपरिषदेच्या निवडणुक रिंगणातही नगराध्यक्षपदासाठी बसपकडून निवडणुक लढविली होती.
डॉ. विजया नांदुरकर यांचे सामाजिक कार्यात योगदान आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचांराचा पगडा असलेल्या डॉ. विजया या ओबीसी समाजाच्या जनजागृतीत नेहमी पुढे राहतात. त्यांचे पती राजेश नांदुरकर हे बहुजन समाज पक्ष भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.