महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा पूर: जिल्हाधिकाऱ्यांनी SDRF आणि NDRF टीमला केलं पाचारण

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे संजय सरोवरची दारे उघडण्यात आली आणि त्याचा फटका हा भंडारा जिल्ह्याला बसला. जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा पवनी आणि लाखांदूर तालुक्यात पूर आले. लाखांदूर तालुक्यातील ईटान गावात पाणी शिरल्याने या गावाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बऱ्याच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि बऱ्याच गोष्टींचे नुकसान झाले आहे.

bhandara flood : district collector Called sdrf and ndrf term for rescue
भंडारा पूर: जिल्हाधिकाऱ्यांनी SDRF आणि NDRF टीमला केलं पाचारण

By

Published : Aug 30, 2020, 3:32 PM IST

भंडारा -जिल्ह्यातील पूर परिस्थिती ही मध्य प्रदेशमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमला बोलवण्यात आले असून त्या अगोदर स्थानिक पोलीस विभाग आणि इतर नागरिकांच्या मदतीने आतापर्यंत अनेक नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जर मध्य प्रदेशमधील संजय सरोवरचे पाणी सोडले गेले नाही तर ही परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल, अशी आशादायक माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली.

अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी संदीप कदम
मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे संजय सरोवरची दार उघडण्यात आली आणि त्याचा फटका हा भंडारा जिल्ह्याला बसला. जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा पवनी आणि लाखांदूर तालुक्यात पूर आले. लाखांदूर तालुक्यातील ईटान गावात पाणी शिरल्याने या गावाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बऱ्याच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि बऱ्याच गोष्टींचे नुकसान झाले आहे.
पाण्यात बुडालेला ट्रक...
तुमसर, मोहाडी, भंडारा आणि लाखांदूर या चारही तालुक्यात पुराच्या पाण्यात असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिक आणि पोलिस यंत्रणेमार्फत केले जात आहेत. मात्र त्यासाठी लागणारी यंत्रणा कमी पडत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले. आज दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान ही टीम पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाण्यात अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या संजय सरोवरची गेट बंद करण्यात आले आहेत. पण यापुढे हे गेट उघडली गेली तर परिस्थिती अजून वाईट होण्याची शक्यता आहे. तरी सर्व यंत्रणा सज्ज असून त्यानुसार परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. सध्या गोसे धरणाचे सर्व म्हणजे 33 दार साडेचार मीटरने उघडण्यात आली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details