महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणात भंडारा जिल्हा राज्यात अव्वल - भंडारा कोरोना लसीकरण न्यूज

1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. हा 45 ते 60 वर्षे वयोगटातील एक लाख 64 हजार 464 नागरिकांच्या लसीकरणाचे जिल्ह्यात उद्दिष्ट आहे.

vaccination
लसीकरण

By

Published : Mar 24, 2021, 10:18 PM IST

Updated : Mar 24, 2021, 11:01 PM IST

भंडारा-वाढता कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. भंडारा जिल्हा हा ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणात 23 मार्च पर्यंत राज्यात अव्वल आहे. जिल्ह्यात 36 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.



1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. हा 45 ते 60 वर्षे वयोगटातील एक लाख 64 हजार 464 नागरिकांच्या लसीकरणाचे जिल्ह्यात उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात 22 मार्चपर्यंत 62 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झालेले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणात भंडारा जिल्हा राज्यात अव्वल

हेही वाचा-शेअर बाजाराच्या पडझडीने गुंतवणुकदारांचे ३.२७ लाख कोटींचे नुकसान

प्रति दिन दहा हजार लस देण्याचे उद्दिष्ट

भंडारा जिल्ह्यात सध्या 8, 900 प्रतिदिन लस देण्यात येत आहेत. हे उद्दिष्ट वाढवून प्रति दिन दहा हजार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आरोग्य विभागाला दिले आहे. सध्या जिल्ह्यात लसीचे आवश्यक डोस उपल्बध आहेत. या संसर्गजन्य आजारावर लस हाच योग्य पर्याय असून पात्र लाभार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी केंद्रावर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे लस घेतल्यानंतर कोरोनाचा गंभीर धोका टाळता येतो.

हेही वाचा-मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद; बुधवारी 5185 नवीन कोरोनाबाधित

कोणाला किती डोस?

आरोग्य कर्मचारी व ऑनलाईन वर्कर मिळून भंडारा जिल्ह्यात 19 हजार 154 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये दहा हजार 595 आरोग्य कर्मचारी व 8, 539 वर्गाचा समावेश आहे. नियमित कोव्हिड लसीकरण अंतर्गत 8,722 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 6,050 एवढी आहे. तर 5,251 फ्रन्टलाइन वर्करने कोरोनाविरोधातील लशीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 1, 751 एवढी आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणासाठी यावे, असे आव्हान जिल्हा शल्यचिकित्सकांनी केलेले आहे.

Last Updated : Mar 24, 2021, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details