भंडारा -राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे भंडारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या तीन दिवसांत ही स्पर्धा होणार असून आठ विभागाच्या 36 जिल्ह्यांचे 48 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. 14, 17 आणि 19 वर्षांखालील स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. यापैकीच राष्ट्रीय संघाची निवड केली जाणार असून हा संघ आंध्रप्रदेशमध्ये होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा हेही वाचा -चीन ओपन : सिंधू पाठोपाठ सायनाही सलामीलाच पराभूत; पारपल्ली, प्रणित विजयी
छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आणि त्यांचे संघ संपूर्ण तयारीला लागले आहेत. या स्पर्धेसाठी मैदानावर सहा ग्राउंड तयार करण्यात आले असून या सहा ग्राउंडवर एकाच वेळेस ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत २२५ मुले तर 225 मुली खेळणार आहेत. राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी 120 जणांची पंच आणि तांत्रिक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 14 आणि १७ वर्षांखालील स्पर्धकांचे प्रत्येकी दोन संघ आणि 19 वर्षांखालील स्पर्धकांचे दोन संघ हे आंध्रप्रदेश वेस्ट गोदावरी इथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करतील.
क्रीडा संकुलात एवढ्या स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे गुरुदत्त मंगल कार्यालयात मुलींची तर संताजी मंगल कार्यालयामध्ये मुलांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.