भंडारा -जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येमध्ये अतोनात वाढ झाली आहे. अतिशय गंभीर बाब म्हणजे या मृतांमध्ये 72 तासाच्या आत मरणाऱ्या लोकांची संख्या अतिशय जास्त आहे. ज्या नागरिकांनी उपचार न करता आजार अंगावर काढला आणि शेवटी उपचारसाठी रुग्णालयात दाखल झाले अशाच लोकांचा 72 तासांच्या आत मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोना पासून वाचायचे असल्यास कोरोना सारखी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्या, असे आव्हान जिल्हाधिकारी आणि डॉक्टर यांनी नागरिकांना केले.
सावधान ! 'अंगावर आजार काढला तर जीवावर बेतेल, जिल्ह्यत 72 तासात मरणाऱ्यांची संख्या सर्वात ज्यास्त' - bhandara corona patient death news
भंडारा जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून कोरोना या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ होत आहे. यावरुन असे दिसते की नागरिक सिरियस झाल्यावर उपचारसाठी येतात. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला असतो. त्यामुळे त्यांना वाचविणे शक्य होत नाही. त्यामुळे आजार अंगावर काढू नये, अशी विनंती जिल्हाधिकारी आणि डॉक्टरांनी नागरिकांना केली आहे.
भंडाऱ्यात 72 तासात मरणाऱ्यांची संख्या सर्वात ज्यास्त
प्रत्येक नागरिकांनी कोरोनासारखे लक्षणे दिसताच शक्य तेवढ्या लवकर कोरोनाची टेस्ट करावी. ज्यामुळे तुमचा जीव वाचेल आणि कोरोनाचा समाजात होणारा प्रादुर्भाव थांबू शकेल. आजार अंगावर काढाल तर तुमच्या जीवावर बेतेल. त्यामुळे आजार अंगावर काढू नये, अशी विनंती जिल्हाधिकारी आणि डॉक्टरांनी नागरिकांना केली आहे.
Last Updated : Sep 22, 2020, 7:31 PM IST