भंडारा -'ब्रेक द चैन' चैन अंतर्गत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी राबविलेल्या चार सूत्री कार्यक्रमाने भंडारा जिल्ह्यातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात 14 दिवसांत तब्बल 13 हजारांच्यावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 मेपासून 14 मेपर्यंत तब्बल 13 हजार 078 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर 91.53 टक्क्यांवर गेला आहे.
लॉकडाऊनचे कडक पालन -
भंडारा जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने अक्षरक्षा: थैमान घातले आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत 39 हजार 153 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 684 बाधितांचा मृत्यु झाला आहे. या सर्वांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी चार सूत्री कार्यक्रम आखुन त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली. लॉकडाऊनची 100 टक्के अंमलबजावणी व्हावी यासाठी उपाययोजना केल्या. ठरलेल्या वेळेत अत्यावश्यक सेवेच्या सर्व दुकाने आणि बाजारपेठ बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली.
कंटेनमेंट झोनची निर्मिती -
या चार सूत्री कार्यक्रमात जास्तीत जास्त कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले. ज्या परिसरात किंवा इमारतीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असेल त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन निर्माण केला. संपूर्ण जिल्ह्यात जवळजवळ 400च्यावर कंटेनमेंट झोन तयार करुन त्याठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आले. अनेक अधिकारीही या ठिकाणी पाहणीसाठी नेमण्यात आले. जिल्हाधिकारींनीही अशा ठिकाणी भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे मनोबल वाढवीत परिसराच्या आत राहण्याचे निर्देश दिले.
हेही वाचा -काँग्रेसच्या मंत्र्याने केले गडकरींचे कौतुक, फडणवीसांना काढला चिमटा
मेडीवेस्टची योग्य विल्हेवाट -