महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा : देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट - फडणवीसांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा भंडारा

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सुरू असलेली तयारी आणि म्युकरमायकोसिस आजारावर सुरू असलेल्या उपाययोजना याबाबत फडणवीसांनी प्रभारी जिल्हा शल्सचिकित्सकांशी चर्चा केली. तसेच जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट
देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

By

Published : May 26, 2021, 5:22 PM IST

भंडारा -विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सुरू असलेली तयारी आणि म्युकरमायकोसिस आजारावर सुरू असलेल्या उपाययोजना याबाबत फडणवीसांनी प्रभारी जिल्हा शल्सचिकित्सकांशी चर्चा केली. तसेच जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात जिल्ह्यात कोरोना स्थिती अत्यंत बिकट होती. या परिस्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होत असून, कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही त्रुटी जाणवत आहेत. या त्रुटी दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधिंना देण्यात आल्याचे यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान फडणवीसांनी ऑक्सिजन प्लांट व कोरोना वार्डाची देखील पाहाणी केली. सध्या म्युकरमायकोसीसच्या सर्जरीसाठी जिल्ह्यातील रुग्णाला नागपूर पाठवण्यात येत आहे. ही सर्जरी जिल्ह्यातच कशाप्रकारे करता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत असं देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

'5 महिन्यांनतरही फायर यंत्रणा नाही'

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये दहा बालकांचा जळून मृत्यू झाला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी रुग्णालयाला भेट दिली, व फायर यंत्रणेची घोषणी केली. मात्र 5 महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही फायर यंत्रणा न लागणे ही दुर्दैवाची बाब आहे. आता टेंडर काढले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली, अंस देखील यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे.

'धान खरेदी केद्रांवर राजकीय लोकांचा वरदहस्त'

शेतकऱ्याचे उन्हाळी धान कापून तयार आहे. मात्र एक मेपासून धान खरेदी केंद्र सुरू असल्याचा दावा करूनही आतापर्यंत धान खरेदी करण्यात आले नाही. एवढेच नाही तर खरिपातील बोनसचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली अशा प्रत्येक शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे बंधनकारक नसल्याचे पत्रक शासनाने काढले आहे. धान खरेदी केंद्रांवर काही राजकीय लोकांचा वरदहस्त आहे. त्यामुळे धान खरेदी करण्याऐवजी हे लोक व्यापाऱ्यांचा फायदा करत आहेत, असा आरोपी देखील यावेळी फडणवीसांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

'आरक्षणाच्या बाबतीत शासनाची दुटप्पी भूमिका'

आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या लोकांची दुटप्पी भूमिका आहे. यांची सामाजिक बांधिलकी वेगळी आणि सामाजिक न्याय वेगळा आहे. हे सर्व लोक ठरवून एकाच विषयावर वेगवेगळ्या पद्धतीने मुद्दाम बोलत असतात, अशा शद्बात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा -हिंगोलीच्या सोनूवर कोणालाच भरवसा नाय, तब्बल १३ नवरदेवांना फसवणारी सोनू अखेर गजाआड

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details