महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदी : मजुरांवर होणारी उपासमार टाळण्यासाठी शिवभोजन थाळी सुरू करण्याचे भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - शिवभोजन थाळी भंडारा बातमी

संचारबंदीमुळे उपासमारीच्या भीतीने हजारो मजूर दररोज कधी पायी तर, कधी सायकलने शकडो किमीचे अंतर गाठून आपले गाव गाठत आहेत. या मजुरांचा विचार करत भंडारा जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीच्या काळात बंद केलेली शिवभोजन थाळी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी बारा ते तीन यादरम्यान राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या महसूल कँटीनमध्ये लोकांसाठी शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवभोजन थाळी
शिवभोजन थाळी

By

Published : Mar 29, 2020, 2:06 PM IST

भंडारा - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घातलेल्या संचारबंदीच्या काळात हातावर पोट भरणाऱ्या लोकांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत त्यांना पडली आहे. अशा लोकांसाठी भंडारा जिल्ह्यधिकारी यांनी शिवभोजन थाळी पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे या लोकांना फुकट जेवण मिळाल्याने या मजुरांची जेवणाची व्यवस्था झाली आहे.

शिवभोजन थाळी

संचारबंदीमुळे उपासमारीच्या भीतीने हजारो मजूर दररोज नागपूरवरून कधी पायी तर, कधी सायकलने शकडो किमीचे अंतर गाठून आपले गाव गाठत आहेत. या शेकडो किमीच्या अंतरात त्यांची भूक तहान हरवली असते. किंबहुना, असे म्हणता येईल की त्यांना जेवणाची कुठे व्यवस्था नाही. त्यातच या मजुरांसह त्यांची लहान मुलीसुद्धा भुकेने व्याकुळ झालेली असतात.

या मजुरांचा विचार करीत भंडारा जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीच्या काळात बंद केलेली शिवभोजन थाळी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी बारा ते तीन यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या महसूल कँटीनमध्ये लोकांसाठी शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवभोजन थाळीसाठी घेतले जाणारे दहा रुपये घेतले जाणार नाहीत.

नागपूरात स्थलांतर होणारे मंजूर भंडारा जिल्ह्यात असलेले मजूर या सर्वांसाठी ही मोफत जेवायची योजना सुरू केली आहे. या मजुरांना मोफत जेवण मिळाल्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार नाही. जिल्हाधिकारी यांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details