भंडारा - जिल्ह्यात गुरूवारी २४४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. २४४ पैकी ११७ रुग्ण हे भंडारा तालुक्यातील असून ७८ रुग्ण हे एकट्या भंडारा शहरातील आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असून आता ९ हॉटस्पॉट शहरात शोधून काढण्यात आलेले आहेत. दहा मार्च नंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे.
१५ दिवसांत अशी झाली कोरोना आकड्यात वाढ
भंडारा जिल्ह्यामध्ये १० मार्चला केवळ ३७ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. मात्र दुसऱ्या दिवशी हा आकडा दुप्पट होऊन ६४ वर पोहोचला आणि तेव्हापासून दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. २४ तारखेला २४४ नवीन कोरोना बाधित रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळले आहेत. तर ७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर १० मार्चला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण९४.७२ टक्के इतके होते. ते आता कमी होऊन ८८.६८ टक्क्यांवर आले आहे.
सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरात
गुरुवारी (काल) आढळलेल्या २४४ रुग्णांपैकी भंडारा तालुक्यातील ११७ रुग्ण आहेत. त्यातही तब्बल ७८ रूग्ण हे शहरातील आहेत. तर पवनी तालुक्यात ५८, मोहाडी तालुक्यात १०, तुमसर तालुक्यात २९, लाखनी तालुक्यात २१, साकोली तालुक्यात ८ आणि लाखांदूर तालुक्यात एक रुग्ण आढळून आले आहे.
हे आहेत शहरात कोरोनाचे नऊ हॉटस्पॉट
झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये भंडारा शहरातील नागरिक सर्वाधिक आहेत. भंडारा शहरातील आढळून आलेल्या नऊ हॉटस्पॉट मध्ये रमाबाई आंबेडकर वार्ड, म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर, राजीव गांधी चौक, प्रगती कॉलनी, केशवनगर, विद्यानगर, सिव्हिल लाइन आणि एम एस ई बी कॉलनी यांचा समावेश आहे. भंडारा शहरात नऊ हॉटस्पॉट असणे हे शहरातील नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
या तालुक्यात आहे ॲक्टिवरुग्ण
सध्या भंडारा जिल्ह्यांमध्ये १४६४ ॲक्टिव पॉझिटिव्ह कोरोना बाधित रुग्ण आहे. या ॲक्टिव रुग्णांमध्ये अर्धे रुग्ण हे भंडारा तालुक्यातील आहेत. भंडारा तालुक्यात ६६१ कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ पवनी तालुक्यात ३००, तुमसर तालुक्यात १७६, लाखनी तालुक्यात १३५, साकोली तालुक्यात ८९, मोहाडी तालुक्यात ८२ तर लाखांदूर तालुक्यात २१ ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
भंडारा शहरात कोरोनाचे 9 हॉटस्पॉट; कोरोना रुग्ण वाढ चिंताजनक - भंडारा कोरोनाचा हॉटस्पॉट बातमी
भंडारा शहरातील आढळून आलेल्या नऊ हॉटस्पॉट मध्ये रमाबाई आंबेडकर वार्ड, म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर, राजीव गांधी चौक, प्रगती कॉलनी, केशवनगर, विद्यानगर, सिव्हिल लाइन आणि एमएसईबी कॉलनी यांचा समावेश आहे. भंडारा शहरात नऊ हॉटस्पॉट असणे हे शहरातील नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
भंडारा कोरोनाचा हॉस्पॉट