महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO: कत्तलीसाठी गोवंश नेणारा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अडवला, चालकाला दिला चोप - गोवंश ट्रक चालक मारहाण बजरंग दल चिचगड

बजरंगदलाच्या कार्यकर्त्याने गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकास मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. ही घटना काल चिचगड येथील टी पॉइंटवर घडली. वाहन चालकाला चांगलाच चोप देण्यात आला. वाहनाची तोडफोड करण्यात आली.

Bajrang Dal truck stopped Chichgad t point
गोवंश ट्रक चालक मारहाण बजरंग दल चिचगड

By

Published : Mar 24, 2022, 12:16 PM IST

Updated : Mar 26, 2022, 9:40 AM IST

गोंदिया- बजरंगदलाच्या कार्यकर्त्याने गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकास मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. ही घटना काल चिचगड येथील टी पॉइंटवर घडली. वाहन चालकाला चांगलाच चोप देण्यात आला. वाहनाची तोडफोड करण्यात आली. वाहनातून 29 जनावरे अवैध वाहतूक होत असल्याची माहिती बजरंग दल आणि गौरक्ष दलाला मिळाली होती. त्यानंतर वाहनाला अडवून हा प्रकार घडला.

व्हायरल व्हिडिओ

हेही वाचा -Shivaji Maharaj Jayanti 2022 : जळगावातील शिवभक्ताचे अनोखे प्रेम, घराला दिले गड - किल्ल्याचे स्वरूप.. पाहा व्हिडिओ

छत्तीसगडवरून ककोडी - चिचगड मार्गे वाहन क्र. सीजी-10. सी. 6248 मधून 29 जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती बजरंग दल व गौरक्षक दलाला मिळाली होती. त्यावरून त्यांनी चिचगड येथील टी पॉइंट गाठला. वाहनाला अडवत वाहन चालकास चागंलाच चोप देत वाहनाची तोड फोड करण्यात आली. संपूर्ण माल चिचगड येथील काशीम नावाच्या व्यक्तीचा असल्याचे वाहन चालकाकडून सागण्यात आले. या घटनेची माहिती चीचगड पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी कत्तलीसाठी वाहनातून नेत असलेली संपूर्ण जनावरे, वाहन व वाहन चालकास ताब्यात घेतले आहे. वाहन चालकाचे दोन सहकारी फरार झाले असून, पुढील तपास चीचगड पोलीस करीत आहेत.

देवरी तालुक्यातील ककोडी हे गाव महाराष्ट्र राज्याच्या टोकावर असून, छत्तीसगड राज्याला लागून आहे. छत्तीसगड येथून ककोडी - चिचगड या महामार्गाने महाराष्ट्रात जनावरांची तस्करी सुरूच असून, नियमितपणे मोठ्या प्रमाणावर होणारी ही तस्करी रोखण्यास स्थानिक प्रशासन असमर्थ ठरले आहे. महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही छत्तीसगडवरून ककोडी - चिचगड मार्गे महाराष्ट्रात कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमितपणे जनावरे नेल्या जात आहेत.

हेही वाचा -Eknath Khadse on Devendra Fadnavis : फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेले वक्तव्य वेदनादायी - एकनाथ खडसे

Last Updated : Mar 26, 2022, 9:40 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details