महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019 : भंडाऱ्यात विधानसभेची पूर्वतयारी पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Preparation Complete for elections in Bhandara

जिल्ह्यामध्ये एकूण 1206 मतदान केंद्र आहेत. यामध्ये तुमसर विधानसभा क्षेत्रात 152789 पुरुष तर 148951 स्त्री असे एकूण 301730 मतदार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रात 160824 पुरुष तर 157416 स्त्री मतदार असे एकूण 318245 मतदार आहेत. तर भंडाराविधान सभेत स्त्री मतदारांची संख्या ही जास्त आहे. यामध्ये 185216 पुरुष आणि 185474 स्त्रिया असे एकूण 370690 मतदार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 5314 मतदान कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेताना जिल्हाधिकारी नरेश गीते

By

Published : Sep 7, 2019, 10:24 PM IST

भंडारा - आगामी विधानसभा निवडणुक 2019 साठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी झाली आहे. 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार 9 लाख 90 हजार 665 मतदार आहेत. यामध्ये 6 हजार 977 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे, भंडारा विधानसभा क्षेत्रात स्त्री मतदार या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहेत. तर मतदार यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही हे तपासून पाहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नरेश गीते यांनी केले आहे.

हेही वाचा -सत्तारांचा शिवसेनाप्रवेश भाजपच्या जिव्हारी.. नगराध्यक्षावर आणला अविश्वास

जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 206 मतदान केंद्र आहेत. यामध्ये तुमसर विधानसभा क्षेत्रात 152789 पुरुष तर 148951 स्त्री असे एकूण 301730 मतदार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रात 160824 पुरुष तर 157416 स्त्री मतदार असे एकूण 318245 मतदार आहेत. तर भंडाराविधान सभेत स्त्री मतदारांची संख्या ही जास्त आहे. यामध्ये 185216 पुरुष आणि 185474 स्त्रिया असे एकूण 370690 मतदार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 5314 मतदान कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणूक 2019 : भंडाऱ्यात विधानसभेची पूर्वतयारी पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

हेही वाचा -निमित्त उद्घाटनाचे, अजेंडा विधानसभेचा; नरेंद्र मोदी ७ सप्टेंबरला राज्य दौऱ्यावर

यासोबतच या निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यांची प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. याबरोबरच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर कसा करायचा याविषयीची जनजागृती करण्यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी 5 ईव्हीएम व संच देण्यात आले आहेत. त्याद्वारे प्रत्येक गावोगावी जाऊन लोकांची जनजागृती सुरू केली आहे. तसेच सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी कॉलेज, संकल्प पत्राचे वाटप, अपंगांची कार्यशाळा घेणे, फोटो स्लिप वाटप करणे, रॅलीचे आयोजन करणे, वादविवाद स्पर्धेचे आयोजन करणे अशा विविध माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details