भंडारा -राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या 43 रुग्णवाहिका चालकांचे दोन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज खासदार सुनील मुंढे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. वेतन वाढ, बोनस आणि अन्य मागण्यांसाठी 24 नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन सुरू होते.
2007पासून आहेत कामावर-
जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील 43 रुग्णवाहिका चालक 2007पासून कार्यरत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या या वाहनचालकांचे वेतन सुरुवातीला जिल्हा परिषदेतर्फे जननी सुरक्षा योजनेअंतर्गत दिले जात होते. त्यानंतर बीवीजी या खासगी कंपनीच्या माध्यमातून या चालकांना वेतन देण्यात येत होते. 2018पासून अशोकॉम मीडिया इंडिया लिमिटेड, भोपाल या कंपनीला कंत्राट देण्यात आले. या वाहनचालकांचे वेतन ही कंपनी अदा करीत होती. मात्र, कंपनी नेहमीच या चालकांवर अन्याय करीत होती.
भंडारा : दोन दिवसांपासून सुरू असलेले रुग्णवाहिका चालकांचे उपोषण मागे - bhandara latest news
कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या 43 रुग्णवाहिका चालकांचे दोन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज खासदार सुनील मुंढे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले.
भंडारा: दोन दिवसांपासून सुरू असलेले रुग्णवाहिका चालकांचे उपोषण मागे
वाहनचालक अनेकदा आपल्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत आलेत, त्यांच्या मागण्यांच्या दृष्टीने मी पाठपुरावा करीत आहे. नऊ डिसेंबरपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन आता देण्यात आले आहे. 9 तारखे पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आपण स्वतः कंपनीच्या विरोधात मोठे आंदोलन उभारू आणि वाहनचालकांना न्याय देण्यासाठी दिल्ली मुंबईपर्यंत पाठपुरावा करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.