भंडारा -जिल्हा सामान्य रुग्णायलातील विष प्राशन केलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या गेट समोर मृतदेह ठेवत आंदोलन सुरू केले आहे. चंद्रशेखर तुमसरे (वय 34 रा. गोंड सावरी) असे मृतकाचे नाव आहे.
माहिती देताना चंद्रशेखर तुमसरे यांचे भाऊ हेही वाचा-भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांचा दावा
डॉक्टरांनी वेळीच योग्य उपचार न केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली असून, जोपर्यंत डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
पोटातील विष काढले गेले नाही
भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील रहिवासी चंद्रशेखर तुमसरे यानी कौटुंबिक वादानंतर १९ जानेवारी रोजी रात्री 11.30 च्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. रात्रीला तुमसरे यांच्या आईला ते उलट्या करताना दिसून आले. तुमसरे यांनी काही तरी खाल्ले असे कळताच त्यांच्या आईनी व भाऊ रुपेश तुमसरे यांनी त्यांना लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. रुग्णाचा प्राथमिक उपचार करून रुग्णाला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, 20 जानेवारीच्या सायंकाळी 10 च्या सुमारास चंद्रशेखर याचा मृत्यू झाला. सामन्य रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे माझ्या भावाचा जीव गेला, असे आरोप करीत तुमसरे यांचे भाऊ व त्यांचे नातेवाईक यांनी मृतदेह शल्यचिकित्सक यांच्या दरवाज्या पुढे ठेवत आंदोलन केले.
शल्य चिकित्सकावर कार्यवाहीची मागणी
तुमसरे यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती केल्यानंतर येथील डॉक्टर आणि नर्सेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या पोटातील विष स्वच्छ करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण न करता केवळ इंजेक्शन आणि सलाईन लावून त्यांचा उपचार सुरू ठेवण्यात आला. पोटातील सर्व विष बाहेर आले असते तर त्यांचा जीव वाचवता आला असता, असा दावा मृतकाचे नातेवाईक असलेल्या डॉक्टरने केला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सक यांचे या रुग्णालयावर अजिबात नियंत्रण नसल्याने या रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर हे निष्काळजीपणाने वागत असल्याने सामान्य जनतेला नाहक त्यांचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे, या घटनेला जबाबदार असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत कार्यवाही होणार नाही तो पर्यंत मृतदेहासह रुग्णालायासमोर बसून राहू, असा पवित्रा तुमसरे यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. जमावाची परिस्थिती बघता पोलीस बंदोबस्त लावून भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार लोकेश काणसे व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी मृतकाच्या नातेवाईंकाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
हेही वाचा-भंडाऱ्यातील डोंगरगाव येथे भरला 'ट्रॅक्टरांचा शंकरपट'