महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांचा दावा - All parties claim Gram Panchayats in Bhandara district

भंडारा लिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींचे निवडणुक निकाल जाहीर झाले आहेत. या ग्रामपंचायतींवर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.

All parties claim 148 gram panchayats in Bhandara district
भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांचा दावा

By

Published : Jan 18, 2021, 8:49 PM IST

Updated : Jan 18, 2021, 10:06 PM IST

भंडारा - जिल्ह्यात झालेल्या 148 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीची ही निवडणूक कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसल्याने निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना हे सर्वच पक्ष बऱ्याच ग्रामपंचायतीवर एकाच वेळेस आपला दावा सांगत आहेत. त्यामुळे नेमका कोणत्या पक्षाने या निवडणुकीत बाजी मारली हे सांगणे अतिशय कठीण होत आहे.

भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांचा दावा

भाजपच्या मते त्यांनी 90 ग्रामपंचायतीवर मिळवला विजय -

आज झालेल्या मतमोजणीनंतर भाजपाने 148 पैकी तब्बल 90 ग्रामपंचायतींवर आपला हक्क गाजविला आहे. यामध्ये सर्वाधिक भंडारा तालुक्यातील 35 पैकी 22 जागांवर विजय मिळविला तर काँग्रेसने तेरा जागांवर विजय मिळविला असल्याचे त्यांनी सांगितले. तर तुमसर तालुक्यांमध्ये 18 पैकी 9 बीजेपी तर 9 काँग्रेस, मोहाडी तालुक्यात 17 पैकी 11 बीजेपी तर काँग्रेस 6, लाखनी तालुक्यात 20 पैकी 15 बीजेपी तर काँग्रेस 5, साकोली तालुक्यात 20 पैकी 11 बीजेपी 9 काँग्रेस, पवनी तालुक्यात 27 पैकी 16 बीजेपी 11 काँग्रेस, लाखांदूर तालुक्यात 11 पैकी सहा बीजेपी पाच काँग्रेस ने विजय मिळविला असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसनेही 82 ग्रामपंचायतींवर सांगितले विजय मिळविल्याचे -

आज झालेल्या मतमोजणीनंतर भाजपाने 148 पैकी तब्बल 90 ग्रामपंचायतींवर आपला हक्क गाजविला आहे. यामध्ये सर्वाधिक भंडारा तालुक्यातील 35 पैकी 22 जागांवर विजय मिळविला तर काँग्रेसने तेरा जागांवर विजय मिळविला असल्याचे त्यांनी सांगितले. तर तुमसर तालुक्यांमध्ये 18 पैकी 9 बीजेपी तर 9 काँग्रेस, मोहाडी तालुक्यात 17 पैकी 11 बीजेपी तर काँग्रेस 6, लाखनी तालुक्यात 20 पैकी 15 बीजेपी तर काँग्रेस 5, साकोली तालुक्यात 20 पैकी 11 बीजेपी 9 काँग्रेस, पवनी तालुक्यात 27 पैकी 16 बीजेपी 11 काँग्रेस, लाखांदूर तालुक्यात 11 पैकी सहा बीजेपी पाच काँग्रेस ने विजय मिळविला असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेनेही 17 जागांवर विजय मिळविल्याचा केला दावा -

बीजेपी आणि काँग्रेस यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेची एकही जागा निवडून आली नव्हती मात्र याविषयी शिवसेनेला विचारले असता त्यांनी पवनी तालुक्यातील पिलांद्री, खांबाडी, केसलवाडा, मिंसी, कातूरली, भेंडाळा, धानोरी आणि शिरसाळा याठिकाणी विजय मिळवला असून भंडारा तालुक्यातील सालबर्डी, उमरी, दाभा लावेश्वर, टवेपार, मांडवी, पचखेडी, पलाडी आणि चोवा या ग्रामपंचायतीवर विजय मिळविला असल्याचे सांगितले.

तीन ग्रामपंचायतीमध्ये बीनविरोध निवडणूक -

भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायती पैकी तीन ग्रामपंचायती मध्ये अविरोध निवडणुका झाला. यामध्ये भंडारा तालुक्यातील रावणवाडी, पवनी तालुक्यातील उमरी आणि साकोली तालुक्यातील चारगाव या गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक लोकं त्यांचा आघाडीच्या मार्फत निवडणूक लढतात. यामध्ये पक्ष नसतो त्यामुळे निवडणूक होताच एकाच ग्रामपंचायतीवर सर्वच पक्ष आपल्या पक्षाचे दावेदारी दाखविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच आजच्या या 148 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सर्वाधिक ग्रामपंचायती कोणत्या पक्षाची निवडून आल्या हे सांगणं म्हणजे उंटावर बसून शेळ्या हाकणे सारखा प्रकार ठरेल.

Last Updated : Jan 18, 2021, 10:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details