भंडारा -तब्बल 174 दिवसानंतर भंडारा विभागातील संपूर्ण 1296 संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. बसेस पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी कामावर आल्याने 250 बसेस आज पासून रस्त्यावर धावणार आहे. संपात सहभागी झालेल्या आणि त्यानंतर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई केलेल्या सर्व कर्मचाऱ्यावरील कार्यवाही मागे घेऊन त्यांना बिनशर्त कामावर घेतले गेले आहे. मात्र, या संपामुळे तब्बल 87 कोटीचे नुकसान भंडारा विभागाचे झाले आहे.
भंडारा परिवहन विभागातील सर्वच 1296 संपकरी कर्मचारी कामावर रुजू 30 ऑक्टोबर पासून सुरू होते संप -एसटी महामंडळाचे विलगीकरण व्हावे या मागणीला घेऊन 30 ऑक्टोंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी संपावर गेले होते. बऱ्याचदा त्यांना नोटीस बजावल्या गेल्या काही लोकांवर निलंबनाची कार्यवाही केली गेली, तर काहींना बडतर्फ केल्या गेले. मात्र, संप तरीही सुरूच राहिला. शेवटी सुप्रीम कोर्टाने सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर भंडारा विभागातील भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील संपूर्ण 1296 कर्मचारी 22 तारखे पासून कामावर रुजू होण्यास सुरुवात झाली होती. यामध्ये भंडारा, तुमसर, साकोली, पवनी, गोंदिया आणि तिरोडा आगारचा समावेश आहे.
350 पैकी 250 गाड्या रस्त्यावर धावत आहेत - दरवर्षी बऱ्याच गाड्यांची फिटनेस सर्टिफिकेट आरटीओतर्फे घ्यावी लागते. मात्र, या वर्षी संप सुरू असल्याने बऱ्याच गाड्यांचे फिटनेस सर्टिफिकेट घेता आले नाही. त्यामुळे फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यास या उर्वरित गाड्या रस्त्यावर धावणार आहेत. त्यामुळे लग्न, उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा आनंद प्रवाशांना घेता येणार आहे.
संपामुळे 87 कोटी नुकसान -संप सुरू झाल्यापासून दररोज पाच लाख रुपयेचा नुकसान भंडारा विभागाला सोसावा लागत होता. संपामुळे आतापर्यंत तब्बल 87 कोटींचा नुकसान विभागाला झालेला आहे. आता नुकसान भरून काढण्यासाठी पूर्ण क्षमतेने अधिकारी आणि कर्मचारी कामावर आलेले आहेत. संपामुळे धूळ खात उभ्या असलेल्या बसेसची आता सर्विसिंग करणे. त्याला ऑईल पाणी देणे, नवीन टायर भरणे आदी उपक्रम भंडारा विभागात सुरू झालेले असून प्रवाशांना सर्वोत्तम प्रवासाची सुविधा देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.संपामुळे बसेस बंद असल्याने सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागातील नागरिकांना बसत होता. यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती किंवा शाळकरी व्यक्तींना सर्वाधिक त्रास होतो. मात्र, आता बसेस पुन्हा सुरू झाल्याने हे सर्व प्रवासी आनंदित असल्याचे त्यांनी सांगितले.