महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 12, 2022, 10:25 PM IST

ETV Bharat / state

भूमिपूजनाच्या तब्बल 34 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोसे धरण पहिल्यांदाच 100 टक्के भरले

भंडारा जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी गोसे प्रकल्प 34 वर्षानंतर पहिल्यांदाच शंभर टक्के भरला आहे. 245.500 ही सर्वोच्च पाणी पातळी धरणाने यावर्षी गाठलेली आहे. अडीच लाख हेक्टर शेतीला सिंचन देण्याच्या उद्देशाने 1988 मध्ये याचे भूमिपूजन झाले होते. मात्र उद्देशाची पूर्ती होण्यासाठी तब्बल 34 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली.

gose dam bhandara
gose dam bhandara

भंडारा - भंडारा जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी गोसे प्रकल्प (Gose Dam project) 34 वर्षानंतर पहिल्यांदाच शंभर टक्के भरला आहे. 245.500 ही सर्वोच्च पाणी पातळी धरणाने यावर्षी गाठलेली आहे. अडीच लाख हेक्टर शेतीला सिंचन देण्याच्या उद्देशाने 1988 मध्ये याचे भूमिपूजन झाले होते. मात्र उद्देशाची पूर्ती होण्यासाठी तब्बल 34 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली.

राजीव गांधी यांच्या हस्ते झाले होते भूमिपूजन -
पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतीला सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी 1983 साली भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीवर गोसे प्रकल्पल निर्मितीची शासकीय मान्यता मिळाली. यानंतर 1988 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते (Bhumi Pujan was performed by Rajiv Gandhi) पायाभरणी करण्यात आली.

गोसे धरण पहिल्यांदाच 100 टक्के भरले
372 कोटींचा प्रकल्प आज 18 हजार कोटींचा -
प्रकल्पाची पायाभरणी झाल्यानंतर धरणाच्या कामाला सुरुवात झाली. सुरवातीला 372 कोटी हा प्रकल्प होता. प्रकल्पासाठी लागणाऱ्या शेतीचे अधिग्रहण, प्रकल्पबाधित लोकांचे पुनर्वसन आणि कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार या या सर्व कारणांमुळे प्रकल्प रेंगाळत राहिला आणि 372 कोटींचा हा प्रकल्प पाहता पाहता आज 18, 495 कोटींचा झाला आहे.
अडीच लक्ष हेक्टर शेतीला मिळेल सिंचन व्यवस्था -
गोसे प्रकल्पांमध्ये भंडारा जिल्ह्यातील 34 गावे अंशतः व 70 गावे पूर्णतः तसेच नागपूर जिल्ह्यातील 28 गावे अंशतः व 51 गावे पूर्णतः अशाप्रकारे एकूण 183 गावे बाधित झाले आहेत. गोसीखुर्द जलाशयाचे बुडीत क्षेत्र 26, 603. 57 असून यामध्ये खासगी जमीन 20,252 28 हेक्टर आणि शासकीय जमीन 5430.06 हेक्टर व वन जमीन 913.21 हेक्‍टर इतक्‍या क्षेत्राचा समावेश आहे. बुडीत क्षेत्रामध्ये नागपूर जिल्ह्यातील 13, 852. 29 हेक्‍टर व भंडारा जिल्हा मधील 14, 651. 28 हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. प्रकल्पाची एकूण 2,50, 800 हेक्‍टर एवढी सिचन क्षमता आहे.
प्रकल्पग्रस्त लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष -
गोसे धरण आहे त्याची पाणी पातळी गाठली असली तरी हे धरण पूर्ण करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही 1988 मध्ये राजीव गांधी यांनी उद्घाटनाच्या वेळी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता झाली नाही एवढेच काय तर प्रकल्पबाधित गावाचे पुनर्वसन करतांना या सुविधांची गरज असते. त्याचीही पूर्तता बऱ्याच ठिकाणी केली गेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त लोकांचे विचार केले जावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्त करीत आहेत.
नवीन ठिकाणी शिरत आहे पाणी -
245.500 पाणी पातळी गाठल्यानंतर ज्या नवीन ठिकाणी पाणी पोहचले आहे त्याचे सर्वे केले जाणार आहे. त्यानंतर नवीन बुडीत क्षेत्र ठरवून त्याक्षेत्रातील लोकांना मोबदला दिला जाणार आहे. तसेच डावा कालवा आणि उजवा कालवा तसेच लिफ्ट एरिकेशन काम लवकरच पूर्ण करून अडीच लाख हेक्टर शेतीला पूर्ण क्षमतेने सिचन करू, असे गोसे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details