भंडारा -अधिकारी कोमात आणि नियम तोडणारे जोमात ही बातमी ई टीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आज (गुरुवार) जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी भंडारा यांना तातडीने नियम तोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशाचे पालन करत नगरपालिकेचे कर्मचारी पाचनंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी गेले असता या दुकानदारांनी कर्मचार्यांशी जोरदार भांडण केले. एवढंच नाही तर स्थानिक नेत्यांनीही तिथे पोहोचत कारवाई करू दिली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला आहे की, कारवाई करावी तरी कशी.
'ई टीव्ही भारत'च्या बातमीचा दणका, भंडाऱ्यात नियम तोडणाऱ्यांवर पुन्हा कारवाई सुरू
अधिकारी कोमात आणि नियम तोडणारे जोमात ही बातमी ई टीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आज (गुरुवार) जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी भंडारा यांना तातडीने नियम तोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
या सर्व घटनेनंतर या पालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला की वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करावे तरी कसे. दुकानदार भांडतात आणि नेते त्यांच्या बाजूने उभे राहून कारवाई करू देत नाहीत. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नागरिकांना नियमाचे पालन करण्यास सांगितले आहे. जर नागरिकांनी नियमाचे पालन केले नाही, तर पुन्हा अशी परिस्थिती येऊ शकते असेही त्यांनी सांगितले. मात्र, एवढे असतानाही भंडाऱ्यातील काही व्यापारी नियमांचे पालन करीत नाहीत. या काही लोकांमुळे भविष्यात याचा भुर्दंड इतरांनाही भोगावा लागेल.