महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोहफूल दारू निर्मिती करणाऱ्या तीन ठिकाणी कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने मोहाडी तालुका आणि भंडारा तालुक्यामध्ये तीन ठिकाणी कारवाई करून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून भंडारा जिल्ह्यात याअगोदर काम केले आहे. नुकतेच ते जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेत.

भंडारा
भंडारा

By

Published : Sep 25, 2020, 10:46 PM IST

भंडारा - जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नव्याने रुजू झालेल्या वसंत जाधव यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने मोहाडी तालुका आणि भंडारा तालुक्यामध्ये तीन ठिकाणी कारवाई करून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून भंडारा जिल्ह्यात याअगोदर काम केले आहे. नुकतेच ते जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेत. रुजू होताच त्यांनी जिल्ह्यातील जुगार अवैध दारू आणि अवैध धंदे बंद करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले.

अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने या अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केलेली आहे. शुक्रवारी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोहाडी तालुक्यातील खमारी (बु.) येथील सूर नदीच्या काठावर अवैध दारू निर्मिती केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यवाही करत सुरेंद्र गणलाल माहुले याच्या ताब्यातून 24 प्लास्टिकच्या पोतड्यामधील 480 किलो सडवा, मोहाफूल व इतर साहित्य असे 51,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्या विरोधात पोलीस ठाणे मोहाडी येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- एनसीबी 'ड्रग्ज' तपास: एकाकडून दुसरा, दुसऱ्याकडून तिसरा, तिसऱ्याकडून अनेकांचे कसे होते संबंध?

दुसरी कारवाई मोहाडी तालुक्यातीलच असून दामू देवनाळ निखाळे (रा. मोहाडी) हा अवैध मोहा दारू निर्मिती करीत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत 12 मातीच्या मडक्यांमध्ये 240 किलो मोहफूल सडवा किंमत 27,600 जप्त केला असून त्याच्या विरोधातही मोहाडी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तिसरी कारवाई भंडारा तालुक्यातील जवाहर नगर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कोंडी येथील जंगल शिवारात करण्यात आली असून आरोपी सुशील राजकुमार मेश्राम (वय 30) राहणार सावरी यांच्या ताब्यातून 61 प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये सडवा मोहफूल 1220 किलो व इतर साहित्य असा एकूण 1, 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जवाहर नगर पोलीस ठाण्यामध्ये यांच्याविरुद्धही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या तिन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये आरोपी दामू निखाडे, आरोपी सुरेंद्र माहुले, आरोपी सुशील मेश्राम यांना अटक केली असून यांच्याकडून 1940 किलोचा सडवा मोहफूल आणि इतर साहित्य असा 2,05,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

हेही वाचा- वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून 'ते' ट्विट डिलीट केलं - अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details