भंडारा - जिल्ह्याच्या पालांदूर येथील किटाळी जंगलात महिलेचे दागिने हिसकावणाऱ्या 2 आरोपींना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 तासात अटक केली असून आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जयंत घनश्याम लोथे (वय 23 वर्षे) व पारस भोजराम पारसकर (वय 23 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
महिलेला जंगलात नेऊन लुटणारे आरोपी चार तासात जेरबंद, भंडारा एलसीबीची कारवाई - bhandara crime news
आई आजारी असल्याची खोटी बतावणी करून महिलेला जंगलात नेऊन लूटणाऱ्या दोन आरोपींना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 तासात अटक केली. आरोपींकडून चोरी केलेला माल हस्तगत केला असून त्यांना पालांदूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
आरोपी चार तासात जेरबंद
या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त होताच घटनास्थळ गाठत तपास सुरु केला. अवघ्या चार तासात पोलिसांनी या दोन्ही आरोपींना साकोली तालुक्यातील सासरा गावातून अटक केली आहे. या आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला असून भारतीय दंड संहिता कलम 394 (34) नुसार गुन्हा दाखल करून पालांदूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.