भंडारा - वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार हेही वाचा - फुल्ल ढोसून झोपले तळीराम गुरुजी; विद्यार्थ्यांची पाटी राहिली कोरी
गोंदिया जिल्ह्यातील कुऱ्हाडी गावात राहणारा आरोपी दिगंबर धनलाल लांजेवाराची (40 वर्षे) गोंदिया सत्र न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली. कारागृहात नेण्यापूर्वी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय तपासणी आटपून या आरोपीला कारागृहाकडे नेत असताना आरोपीची हातकडी सैल होती. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने हातकडीमधून हात अलगद बाहेर काढून धूम ठोकली. आरोपी फरार झाला त्यावेळेस परिसरात अंधार होता आणि त्याचाच फायदा घेत त्याने तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला तसेच शहरात याचा शोध घेतला. मात्र, दिगंबर लांजेवार हा आरोपी कुठेही मिळाला नाही शेवटी गोंदिया पोलिसांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - थर्डक्लास पक्षात जाऊन कारकीर्द संपवायची नाही; विश्वजीत राणेंचा सेनेवर घणाघात