भंडारा -लाखांदुर तालुक्यात एका तरुण ट्रॅक्टर चालकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शेतातील नांगरणी आटपून गावकडे परत जात असतांना ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून चालकाचा त्याखाली दबून मृत्यू झाला. कैलास विनोद गहाणे (वय -22,रा -पिंपळगाव) असे मृत चालकाचे नाव आहे.
ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर खाली दबून शेतकऱ्यांचा मृत्यू शेतीतील नागरणीसाठी गेला -
लाखांदूर तालुक्यातील शहरापासुन 4 किमी अंतरावर असलेल्या पिंपळगाव कोहळी येथील कैलाश हा स्वमालकीच्या ट्रेक्टरने गुरूवारी शेतावर नांगरणीसाठी गेला होता. नांगरणीचे चे काम आटपून गावाकडे परत येत असताना रस्त्यावरील फुटक्या तलावाच्या पाळी वरून जात असताना कैलासचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण अचानक सुटले. ट्रॅक्टर तलाव पाळी वरून खाली कोसळला.
ट्रॅक्टरच्या खाली दबून जागीच मृत्यू -
ट्रॅक्टर पाळी वरून खाली कोसळत ट्रॅक्टर चे चारही चाक वर झाल्याने ट्रॅक्टर खाली दाबून कैलासचा जागीच मृत्यू झाला. कैलाश त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तरुण वयात त्याचा मृत्यू झाल्यामुळे आई वडिलांवर मोठे डोंगर कोसळले आहे. या अपघाताची माहिती होताच परिसरातील शेतकरी मजुरांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टर सरळ केला. मात्र, कैलास ला वाचू शकला नाही. घटनेची माहिती होताच लाखांदूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीसांनी पंचमना करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. एका तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.