महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबाजोगाईजवळ दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, दोघे जखमी - beed

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील राडी ते अंबासाखर कारखाना रस्त्यावर आज (शनिवारी) सायंकाळी 2 दुचाकींची धडक झाली. यात एक जण ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत.

अंबाजोगाईजवळ दोन दुचाकींचा अपघात

By

Published : Aug 24, 2019, 9:00 AM IST

बीड -जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील राडी ते अंबासाखर कारखाना रस्त्यावर आज (शनिवारी) सायंकाळी दोन दुचाकींच्या धडक झाली. यात एक जण ठार तर दोघेजण जखमी झाले आहेत.

महेश केशवदास वैष्णव (३४, रा. हिंगण बु. ता. बीड) हे सध्या अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथील शासकीय रूग्णालयात औषध निर्माण अधिकारी पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ते रूग्णालयातील कामकाज आटोपून अंबाजोगाईला जाण्यासाठी धानोऱ्याला निघाले. प्रल्हादराव सोमवंशी (५५) यांच्या दुचाकीवरून (एमएच १२ जेजी ४९१८) निघाले होते. ते राडी-वाघाळा कारखाना रस्त्यावरील वीट भट्टीजवळ आले असता समोरून दुचाकीवरून (एमएच ०२ एडब्ल्यू ३९५९) भरधाव वेगाने येणाऱ्या योगेश परमेश्वर भालेकर (२५, रा. मांजरी, जि. लातूर) या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले.

त्याचवेळी तिथून जाणाऱ्यांनी खाजगी वाहनातून सर्व जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान परसराम सोमवंशी यांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महेश वैष्णव यांच्या तक्रारीवरून योगेश भालेकर याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details