भंडारा -जिल्ह्यात सापडलेला एकमेव कोरोना रूग्ण बरा होण्याच्या मार्गावर आहे. या रुग्णाला आता 14 दिवस झाले असून लवकरच त्याचा दुसरा अहवाल येणार आहे. हा दुसरा अहवाल निगेटिव्ह येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या रुग्णाला कोरोनाची बाधा कोणामुळे झाली हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
भंडारा जिल्हा सध्या कोरोनाच्या ऑरेंज झोनमध्ये आहे, कारण भंडाऱ्यात कोरोनाचा एक रूग्ण आहे. या महिला रुग्णाला टीबी झाला असून त्याचा उपचार घेण्यासाठी ही व्यक्ती नागपूरवरून भंडारा जिल्ह्यात आली होती. महिन्याभरापासून टीबीचा उपचार सुरू असतानाच 23 एप्रिलला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने या महिलेला कोरोना वार्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचे वैद्यकीय नमुने तासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले. 27 तारखेला ही 45 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.