महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केवळ चार महिन्यातच रस्ताचे तीन तेरा, मोहाडी खमारी रस्त्याची दुरवस्था

तील गिट्टी वर आली असून खड्डे पडले आहेत. एवढ्या कमी कालावधीत डांबरीकरण उखडतेच कसे असा प्रश्न गावकरी करत आहेत. त्यामुळे आता संबंधित दोषी कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहे

उखडलेले रस्ते

By

Published : Nov 19, 2019, 3:38 AM IST

भंडारा - मोहाडी तालुक्यातील खमारी - मोहाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता चार महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता. अवघ्य चार महिन्यात रस्ता खराब झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. निकृष्ठ दर्जाचा रस्ता बनविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

कंत्राटरावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत

चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्ताला ठिकठिकाणी भेगा पडू लागल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी डांबरीकरण उखडले गेले आहे. आतील गिट्टी वर आली असून खड्डे पडले आहेत. एवढ्या कमी कालावधीत डांबरीकरण उखडतेच कसे असा प्रश्न गावकरी करत आहेत. त्यामुळे आता संबंधित दोषी कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहे

हेही वाचा -कोंढा गावातील एटीएम फोडले; मात्र कोणी, प्रश्नचिन्ह निर्माण


अतिवृष्टी झाल्याने संबंधित रस्ता खराब झाल्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता सांगत आहेत. जर मोहाडी तालुक्यात अतीवृष्टीमुळे पिकांचे नुकसान महसूल विभाग दाखवत नाही. तर रस्ता खराब होण्यासाठी अतिवृष्टी कारण कसे होईल, असे नागरिका विचारत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details