भंडारा - शहरात तब्बल 21 इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे भंडारा नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षात उघड झाले आहे. शहरात अजून 10 इमारतींचे सर्वे सुरू आहेत. यापैकी काही इमारती या धोकादायक ठरणार असल्याने, ही संख्या वाढणार आहे. भंडारा नगरपरिषदेने या सर्व 21 इमारतीच्या मालकास नोटीस बजावली आहे. या धोकादायक इमारतीच्या मालकांनी स्वतः या इमारती पडल्या नाही, तर नगर परिषद या इमारती पाडेल असे या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, मान्सून आता तोंडावर आला आहे. यामध्ये मोठा पाऊस झाला आणि त्यामध्ये या इमारती कोसळून, काही दुर्घटना घटली तर त्यास कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भंडारा शहरात 21 इमारत धोकादायक, नगरपरिषदेने घरमालकांना बजावली नोटीस - धोकादायक इमारती
भंडारा नगरपरिषदेने या सर्व 21 इमारतीच्या मालकास नोटीस बजावली आहे. या धोकादायक इमारतीच्या मालकांनी स्वतः या इमारती पाडल्या नाही, तर नगर पालिका या इमारती पाडेल असे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले आहे.
आतापर्यंत 21 इमारतींचे सर्वे झाले असले, तरी अजूनही 10 इमारतींचे सर्वे सुरू असून काही इमारती धोकादायक दिसत असल्याने, सर्वे पूर्ण झाल्यावर धोकादायक इमारतीची संख्या 21 पेक्षा ज्यास्त होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये विदर्भात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे या धोकादायक इमारती तोडण्याचे काम यापूर्वीच का झाले नाही. तसेच, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीचे सर्वेसुद्धा पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे भंडारा नगरपरिषदेकडून सर्वे अजूनही सुरू असून, 21 इमारतींपैकी ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांना अजूनही पाडले नाही. या पार्श्वभूमीवर, सध्याच्या मोठ्या पावासाने या इमारती कोसळल्या तर त्याची जबाबदार कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.