महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोसे धरणाची 33 पैकी 17 दारे उघडली; नागरिकांना सतर्कतेचा इशारा - alert to villages along river bank

जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. गोसे धरणाच्या क्षेत्रात १०७ मि.मि पाऊस बरसला असून वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

गो.से धरण

By

Published : Aug 1, 2019, 8:11 AM IST

भंडारा- मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या वर्षी पहिल्यांदाच गोसे धरणाचे ३३ पैकी १७ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामधून एकूण ६९ हजार ३५८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गो.से धरणाची दृष्ये

जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गोसे धरणाच्या क्षेत्रात १०७ मि.मि पाऊस बरसला असून वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज धरणाची पाण्याची पातळी २४१.५ मीटर एवढी आहे. बुधवारी धरणाची ३३ पैकी १७ दरवाजे उघडण्यात आले असून या पावसाळ्यात पहिल्यांदाच खुशी धरणाचाही दरवाजा उघडण्यात आला आहे. गोसे धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आल्याने त्यामधून ६९ हजार ३५८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details