बीड - रस्ता कामाचे तीन लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी, सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड जिल्हा परिषदेच्या माजलगाव विभागाचे उपअभियंता व माजलगाव पंचायत समितीच्या वरिष्ठ सहाय्यकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हिरामन गालफाडे असे या उपअभियंत्याचे नाव आहे, तर रमेश मिट्ठेवाड असे वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे. हिरामन गालफाडे याच्या कार्यालयात लाच घेताना ही कारवाई करण्यात आली.
6 हजारांच्या लाचेची मागणी
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हिरामन गालफाडेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्ता बांधकामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी गालफाडे यांने तक्रारदार व्यक्तीकडे सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात गालफाडे याच्याबरोबर वरिष्ठ सहाय्यक रमेश मिट्ठेवाड याचा देखील समावेश होता. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार व्यक्तीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले. मिळालेल्या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून, हिरामन गालफाडे याच्यासह रमेश मिट्ठेवाड याला सहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बाळकृष्ण हानपुडे यांनी दिली.
हेही वाचा -कर्जाचे हफ्ते थकल्याने वाहनांवर कारवाई, मनसे आक्रमक