दिलासादायक...! बीडमध्ये दोन दिवसात एकही कोरोना बाधित आढळला नाही - Beed corona positive patient
मागील दोन दिवसात कोरोना रुग्ण बीड जिल्ह्यात आढळलेला नसल्याने दिलासा मिळत आहे. सोमवारी जिल्हा रुग्णालयासह परळी आणि केज मधून रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.
![दिलासादायक...! बीडमध्ये दोन दिवसात एकही कोरोना बाधित आढळला नाही Civil hospital, beed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10:29-mh-bid-03-koronariport-7204030-01062020205649-0106f-1591025209-625.jpg)
बीड - मागील दोन दिवसात बीड जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने पाठवण्यात आलेल्या 9 जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आज घडीला बीड जिल्ह्यात 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 31 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मागील दोन दिवसात कोरोना रुग्ण बीड जिल्ह्यात आढळलेला नसल्याने दिलासा मिळत आहे. सोमवारी जिल्हा रुग्णालयासह परळी आणि केज मधून रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. त्यातील सर्व नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे काही प्रमाणात जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यात आरोग्य विभागाला यश मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात कोरोनासाठी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 25 आहे.