महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed Suicide News : लग्न जुळत नसल्यामुळे युवकाची आत्महत्या; तळ्यात आढळला मृतदेह - युवक आत्महत्या प्रकरण बीड

बीड शहरात लग्न जुळत नसल्याने एका युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील नेकनूर येथील मूळ असलेला केशव काशीद याचा मृतदेह पाली धरणाजवळील तळ्यात आढळून आला. अग्निशमन विभागाने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेने मृत केशवच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Youth Suicide Case Beed
युवकाची आत्महत्या

By

Published : Feb 11, 2023, 4:29 PM IST

बीड: पाली या धरणावर तीन दिवसांपूर्वी एक अज्ञात व्यक्तीचे कपडे सापडले होते. या कपड्यात त्या व्यक्तीचे आधार कार्ड, पैशाचे पॉकेट आणि 75 रुपये आढळून आले होते. यानंतर या व्यक्तीचा शोध सुरू झाला. या त्या व्यक्तीचे नाव केशव काशीद असल्याचे पुढे आल्यानंतर या व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून सापडलेल्या साहित्याची ओळख पटविण्यात आली. पोलिसांना अखेर पालीच्या तळ्यातच केशवचा मृतदेह आढळून आला आहे.



आधारकार्डवरून लागला शोध:मूळ रहिवासी नेकनुरचा असलेला केशव काशीद हा बीडमध्ये आपल्या मामाकडे राहत होता. त्यामध्ये तो गॅरेजवर देखील काम करत होता. मात्र तीन दिवसांपूर्वी मामा आपल्या फॅमिलीसोबत बाहेरगावी गेला असता केशव हा देखील त्या दिवसापासून बेपत्ता होता. मात्र पालीच्या धरणाकाठी केशवचे कपडे पाकीट आणि आधार कार्ड सापडल्याने पोलिसांनी तपास करून त्याची ओळख पटविली. त्यानंतर पोलिसांनी केशवचा शोध घेणे चालू केले त्या दिवशी तळ्यामध्ये रात्रीच्या वेळेस अग्निशामक दल बोलवून पोलिसांनी शोध घेतला. मात्र अंधारामुळे केशवचा शोध लागला नाही. पोलिसांनी सतत या शोध मोहिमेचा पाठपुरावा करत अखेर तीन दिवसानंतर तळ्याच्या पाण्यात केशवचा मृतदेह आढळला. केशवच्या कुटुंबावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला.

लग्न जुळत नसल्याने होता चिंतेत: मृत केशवच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की, लग्न जुळत नसल्यामुळे केशव अनेक दिवसांपासून चिंतेत होता. त्याचे वय देखील निघून चालले होते. अखेर केशवने घरात कोणी नसल्याचे पाहून टोकाचे पाऊल उचलले. केशव कष्टकरी होता. त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलणे योग्य नव्हते, असेही नातेवाईक म्हणत आहेत. मात्र तीन दिवस पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करत केशवला शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणेचा वापर केशवचा शोध घेतला. अग्निशमन दलाच्या टीमने त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मात्र केशवच्या या टोकाच्या निर्णयाने काशीद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीड जिल्ह्यात लग्न जुळत नसल्याने आत्महत्या करण्याच्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले: निरुत्साही, नैराश्य, तणाव, अपयश आदींमुळे तरुणांमध्ये नाकर्तेपणाचे भाव वाढतात. काही परिस्थिती ही सांगताही येत नाही, सहनही होत नाही. अशा परिस्थितीत तरुणांना धीर आणि आधार देण्याची गरज असते; मात्र त्याचा अभाव हल्लीच्या तरुणांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. याच घुसमटीत हृदयविकार सारख्या जीवघेण्या आजाराचे तरुण बळी पडतात. ज्या तरुणांमध्ये घुसमट वाढतच जाते असे तरुण आत्महत्यासारख्या परिणामावर पोहचतात. त्यासाठी ऐन उमेदीतील तरुणांशी संवाद साधल्यास, आपले कुणीतरी आहे, आपली काळजी करणारे कुणीतरी आहे. आपले वाईट होत असताना कुणीतरी आपल्याला सावरणारे आहे. ही मानसिकता तयार होते. मनावरचा ताण कमी होतो. एकटेपणा आणि एकाधिकार हेच तणावाची हृदयविकार आणि आत्महत्येची कारणे आहेत. त्यामुळे पालकांचा संवाद हा याला संजीवनी ठरतो.

हेही वाचा :Fiber Factory Fire Indore: इंदूरमधील फायबर कारखान्याला भीषण आग; 70 मजूर होते कामावर

ABOUT THE AUTHOR

...view details