बीड : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील चीचखंडी शिवारात एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून ( Youth Murder at Chichkhandi in Beed district ) करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. अर्जुन पंढरी गडदे (वय २२, रा. चीचखंडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Beed Crime : धक्कादायक! बीड जिल्ह्याच्या आंबेजोगाईतील चिचखंडी येथे युवकाचा खून - बीड तरुणाचा निर्घृण खून
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील चीचखंडी शिवारात एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून ( Youth Murder at Chichkhandi in Ambejogai ) करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली.
![Beed Crime : धक्कादायक! बीड जिल्ह्याच्या आंबेजोगाईतील चिचखंडी येथे युवकाचा खून Beed Crime](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17310082-thumbnail-3x2-beed.jpg)
तरूणाची निर्घूणपणे हत्या : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी चीचखंडी शिवारात रस्त्याच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. अर्जुनच्या शरीरावरील घाव पाहता दगडाने चेहऱ्यावर, डोक्यात मारून आणि गळा आवळून त्याचा खून ( Youth Murder ) करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांचा तपास सुरू : घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस पुढील तपास करत आहेत.