महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Son Committed Suicide : आई मागे आवाज देत राहिली.. 250 फूट खोल दरीत उडी घेत तरुणाची आत्महत्या - 250 फूट खोल दरीत उडी घेत तरुणाची आत्महत्या

मन सुन्न करणारी धक्कादायक घटना बीडच्या अंबाजोगाई शहरात घडली आहे. 20 वर्षीय मुलांने आईच्या डोळ्यासमोरच 250 फूट खोल दरीत उडी घेऊन केली ( Son Committed Suicide ) आत्महत्या.

Son Committed Suicide
तरुणाची आत्महत्या

By

Published : Oct 31, 2022, 2:10 PM IST

बीड : मन सुन्न करणारी धक्कादायक घटना बीडच्या अंबाजोगाई शहरात घडली आहे. 20 वर्षीय मुलाने आईच्या डोळ्यासमोरच 250 फूट खोल दरीत उडी घेऊन केली आत्महत्या. ( Son Committed Suicide ) दिनेश रमेश लोमटे वय 20 रा. कोष्टी गल्ली अंबाजोगाई असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर दिनेशने आत्महत्या करण्यापूर्वी पत्रकाराने समजून काढतानाचा व्हिडिओ ईटीव्ही भारतच्या हाती लागला आहे.

पत्रकारांनी काढली होती समजूत :आत्महत्या करण्यासाठी आपल्या घरातून धावत सुटलेल्या 20 वर्षीय मुलाच्या पाठीमागे आई थांब थांब करत धावत होती. या दरम्यान मॉर्निंग वॉकला आलेल्या पत्रकारांनी त्याला समजून काढून माघारी पाठवले. मात्र मुलांने त्यानंतर त्याने आईच्या डोळ्यासमोर जवळपास 250 फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली.


आईने फोडला हंबरडा: मयत दिनेश लोमटे हा पहाटेच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घरातून मुकुंदराज परिसराकडे धावत सुटला होता. त्याला रोखण्यासाठी आईही विनवणी करत मागे धावत होती. पण दिनेशवर काहीही परिणाम झाला नाही. आईसाठी त्याच्या मनाला पाझर फुटला नाही. तो धावतच होता, पुढे मॉर्निंग वॉकसाठी आलेले पत्रकार दत्ता आंबेकर, अशोक दळवे, बालाजी खैरमोडे, मारुती जोगदंड यांनी हा प्रकार पाहून दिनेशला थांबवून समजूत काढून शांत केले. यानंतर आई जवळ आल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करून पत्रकार बंधु पुढे गेले. अन् मागे त्याने पुन्हा पळत जाऊन, अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरातील व्ह्यू पॉइंटवरुन, जवळपास 250 फूट खोल दरीत आईच्या डोळ्यांदेखत उडी घेतली. हे पहाताच आईने हंबरडा फोडला.

दिनेशने आत्महत्या का केली ?हे ऐकून पत्रकार धावत आले. दरीत उतरून पाहिले तोपर्यंत दिनेशचा मृत्यू झाला होता. त्यांनतर घटनेची माहिती अंबाजोगाई पोलीसांना देण्यात आली. दरम्यान 20 वर्षांच्या दिनेश या तरुणाने आई मागे धावत असतानाही आपल्या जन्मदातीच्या डोळ्यांदेखत हा टोकचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात असून मन सुन्न झाले आहे. दरम्यान दिनेशने आत्महत्या का केली ? हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details