बीड- महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच परळी तालुक्यातील गोपाळपूर येथील एका 25 वर्षीय महिलेवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेची वाच्छता गावात झाल्याने चारित्र्यावरील अपमान पीडितेला सहन झाला नाही. त्यामुळे सोमवारी रात्री पीडितेने राहत्या घरातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा-धक्कादायक! पुत्रप्राप्ती आणि गुप्त धनाच्या बहाण्याने पाच बहिणींवर भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार
धक्कादायक! बलात्काराची घटना गावात पसरताच 'तिने' संपवले जीवन... - बीड बातमी
महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच परळी तालुक्यातील गोपाळपूर येथील एका 25 वर्षीय महिलेवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर पीडितेने आत्महत्या केली आहे. दरम्यान, आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पीडित महिला गोपाळपूर येथे आपल्या मुलासह राहत होती. कामानिमित्त तिचा पती राहण्यासाठी बाहेरगावी आहे. दरम्यान, याचा फायदा घेत गावातीलच एका नराधामाने या महिलेवर बलात्कार केला. ही बाब सर्व गावात पसरली. त्यामुळे जगण्यात काहीच अर्थ उरला नाही असे पीडितेला वाटायला लागले. दरम्यान, तिने पतीस फोन करुन 'तुम्ही दोन्ही मुलांचा सांभाळ करा, मी जीवन संपवते' असे सांगून विषारी औषध प्राशन केले. पती घरी आला असता, त्याला पत्नी मृत अवस्थेत आढळली.
दरम्यान, पतीच्या तक्रारीवरुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षकांची भेट-
गोपाळपूर येथील बलात्कारानंतर घडलेल्या आत्महत्या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उप अधिक्षक राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.