बीड :बीडमधीलअक्षय रासकर हे ब्लॉगरच्या व यूट्यूबच्या माध्यमातून महिन्याला 10 लाख रुपयांची कमाई करत आहेत. याबाबत त्याच्यासोबत संवाद साधला असता, ते म्हणाले की ब्लॉगरची माहिती मला युट्युबच्या माध्यमातूनच मिळाली. 2009-10 च्या काळामध्ये मला ही माहिती मिळाली होती. युट्युबमध्ये माझे चॅनल चालू केले. मी त्याच्यामध्ये एक आपल्याला पर्मनंट इन्कम सोर्स शोधत होतो. नंतर मला ब्लॉगिंगचा कन्सेप्ट तेथे मिळाला. मी एका खेडेगावामध्ये माझा ब्लॉगिंगचे काम चालू केले.
तरुणांना रोजगार :आपला बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मला त्याच्यामध्ये बदल घडवायचा होता. आज अनेक ठिकाणी ब्लॉगर्सचे कोळगाव म्हणून ओळखला जात आहे. जे शेतकरी आहेत त्यांना व्हाट्सअप व वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही माहिती देत आहोत, मी त्या ठिकाणावरून पैसा सुद्धा कमवत आहे, ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. इथे तरुणांना रोजगार दिला जातो. माझी अशी इच्छा आहे की, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे एक कार्यालय खोलून त्या ठिकाणी असलेले सुशिक्षित बेकार तरुण गोळा करून त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करण्याचे काम मी या ब्लॉगरच्या माध्यमातून करावे. माझ्या गावातील आणि सुशिक्षित तरुण हे काम पाहत आहेत. त्याचबरोबर बीड शहरांमध्ये सुद्धा अनेक तरुण काम करत आहेतय त्याचबरोबर गेवराई, पुणे, संभाजीनगर, या ठिकाणी सुद्धा अनेक तरुण मोठ्या प्रमाणात काम करत आहेत.
कसे मिळवतात पैसे :आमची कमाई डॉलर्समध्ये येते. प्रत्येक महिन्याला मी 30 ते 40 हजार डॉलर कमवत आहे. त्यामध्ये जी कमाई येत आहे. त्यामध्ये, एका वेबसाईटची कमाई येत आहे. त्यामध्ये जे मुले काम करत आहेत, त्या मुलांना त्यामधील 40 व 60 टक्के माझ्याकडे ठेवून घेत आहे. अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला दहा ते बारा लाख रुपये माझ्या वाट्याला येतात. आपण पाहतो की, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग काम करत आहे, जे लोक नोकरी करत आहेत त्यांची मुले नोकरीच्या मागे लागतात. मात्र, जे पालक शेती करत आहेत, त्यांच्या मुलांना शेती करणे किंवा छोटी मोठी नोकरी करणे हा त्यांच्यापुढे पर्याय असतो. माझ्याकडे जी मुले काम करत आहेत, ती सर्व शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना एक चांगला पर्याय ब्लॉगर मधून मिळत आहे.