महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Suicide Due to Unemployment : धक्कादायक! बेरोजगारीला कंटाळून 34 वर्षीय तरुणाची आत्महत्या

बीडमध्ये बेरोजगारीला कंटाळून एका तरूणाने आत्महत्या केली आहे. दयानंद हरिश्चंद्र गाताडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. डी. एडचे शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दयानंद हरिश्चंद्र गाताडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

teenage suicide
तरुणाची आत्महत्या

By

Published : Jan 12, 2023, 3:35 PM IST

बीड :बीडमध्ये बेरोजगारीला कंटाळून एका 34 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यातील काळेगावघाट येथे घडली आहे. दयानंद हरिश्चंद्र गाताडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या :मृत दयानंद गाताडे याने डी. एडचे शिक्षण घेतले होते. तो मागील काही वर्षांपासून शिक्षकाच्या नोकरीच्या शोधात होता. मात्र, नोकरी मिळत नसल्याने तो हताश झाला होता. शेवटी बेरोजगारीला कंटाळून दयानंदने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान अविनाश रामचंद्र गाताडे यांनी दिलेल्या माहितीनंतर केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नैराश्येतून आत्महत्या करणाऱ्यांची मोठी संख्या : 2022 मध्ये तब्बल 550 लोकांनी नैराश्येतून व इतर कारणातून आत्महत्या केली. याविषयीचे धक्कादायक वास्तव Etv Bharat ने मांडले होते. बीड जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय नसल्याने अनेक तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडतात. मात्र नोकरी न लागल्यामुळे नैराश्येतून मृत्यूला कवटाळतात. अनेक वेळा आपण पाहतो की मुलगा किंवा मुलगी जर शिकली तर तिला नोकरी लागली पाहिजे ही अपेक्षा कुटुंबाची असते. मात्र अनेक वेळा आपण पाहतो की सुशिक्षित अनेक पदव्या घेऊनही नोकरी लागत नाही. त्यामुळे नैराश्येतून अनेक तरुण-तरुणी आपले जीवन संपवतात. मात्र असे न करता या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. आत्महत्या न करता त्याला पर्याय शोधला पाहिजे. अनेक उद्योग व्यवसाय आपल्याला करता येतात मात्र असे न करता अनेक तरुण उद्योग व्यवसाय न करता नोकरीच्या शोधात वन वन भटकताना पाहायला मिळतात. त्यामुळे तरुणांनी असे न करता आपला उद्योग व्यवसाय निवडावा व आपले जीवन सुखी व समृद्ध करावे.

पिंपरी- चिंचवडमध्ये विद्यार्थाची आत्महत्या : पिंपरी- चिंचवडमध्ये दहावीतील विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना घडली. त्या मुख्याध्यापकावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष गारळे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव होते. आयुष अभ्यास करत नाही, म्हणून शाळेतून काढून टाकेन, दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही, दहावीच्या परीक्षेला ही बसू देणार नाही. अशी धमकी मुख्याध्यापक हितेश शर्मा देत होते. त्या भितीतून विद्यार्थ्यॊाने आत्महत्या केली.

ABOUT THE AUTHOR

...view details