बीड - कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या तरूणाचा स्वॅब घेतल्यानंतर दोन तासातच अहवाल येण्याअगोदर मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली. हा तरूण आष्टी तालुक्यातील होता.
धक्कादायक.. बीडमध्ये स्वॅब घेतलेल्या तरुणाचा अवघ्या दोन तासांतच मृत्यू - beed corona patients
हा तरूण मागील चार दिवसांपासून आजारी होता. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. म्हणून तो पहिल्यांदा जामखेड येथे उपचारासाठी गेला असता त्याला जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. गुरूवारी रात्री जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.

जिल्हा रूग्णालय, बीड
हा तरूण मागील चार दिवसांपासून आजारी होता. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. म्हणून तो पहिल्यांदा जामखेड येथे उपचारासाठी गेला असता त्याला जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. गुरूवारी रात्री जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर त्याला कोरोना संशयित म्हणून आयसोलेशन वार्डमध्ये दाखल केले गेले. गुरुवारी तपासणीसाठी नमुने पाठवल्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितांची संख्या 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.