महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दाऊतपूर येथे राखेच्या ढिगाऱ्यात पडलेल्या मजुराला सहकाऱ्यांनी दिले जीवदान - परळी बातमी

औष्णिक विद्यूत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदुषण होत असतानाच जेथून राख वाहनात भरली जाते त्या दाऊतपूर येथील राख तळ्यावरे मंगळवार (दि. 23 मार्च) एक मजूर खाली पडला आणि पाहता पाहता तो राखेच्या आत अडकला.

workers saved colleagues life in beed district
राखेतून मजुराला बाहेर काढताना सहकारी

By

Published : Mar 23, 2021, 9:46 PM IST

Updated : Mar 23, 2021, 10:19 PM IST

परळी (बीड) - औष्णिक विद्यूत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदुषण होत असतानाच जेथून राख वाहनात भरली जाते त्या दाऊतपूर येथील राख तळ्यावरे मंगळवार (दि. 23 मार्च) एक मजूर खाली पडला आणि पाहता पाहता तो राखेच्या आत अडकला. यावेळी सोबतच्या सहकारी मजूरांना ही बाब लक्षात येताच प्राण पणाला लावून टीमवर्कने काम करीत या सहकाऱ्याला जीवदान दिले. दरम्यान, येथे काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरीकांतून बोलले जात आहे.

दाऊतपूर येथे राखेच्या ढिगाऱ्यात पडलेल्या मजुराला सहकाऱ्यांनी दिले जीवदान

मुंजाभाऊ बाबुराव मुंडे, (रा. दाऊतपूर) या राख तळ्यावरील काम करणाऱ्या मजुराला आज त्याच्या सहकाऱ्यांनी जीवदान दिले. सकाळच्या दरम्यान वाहनांमध्ये राख भरत असताना तो अचानक खाली कोसळला आणि राखेच्या आत कोंडला गेला. आपल्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्याचे पाहून मजुरांनी धावपळ करत व हाताने राखेचा खड्डा तयार करत त्याला बाहेर काढले. वास्तविक पाहता येथे शेकडो वाहने राख भरून वाहतूक करण्यात येते. त्यासाठी मजुरांची संख्याही खूप मोठी आहे. झालेला प्रकार समजल्यानंतर काही मजुरांनी धाव घेवून त्या मजुराला जीवदान दिले, अन्यथा कोणताही अनर्थ घडू शकला असता. दरम्यान राख तळ्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षीततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आपल्या कुटूंबाचा हा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेकडो मजूर येथे प्राण पणाला लावून काम करत असून त्यांच्या सुरक्षीततेची हमी कोणाची? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

हेही वाचा -काळरात्र.. बापाच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याचे जाग येण्यापूर्वीच हरवलं 'पितृछत्र'

Last Updated : Mar 23, 2021, 10:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details