अंबाजोगाई (बीड)- स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील महिला डॉक्टरांचा पीपीई किट घालून केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. यात महिला डॉक्टर गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत आहेत.
बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टरांचा पीपीई किट घालून डान्स - doctor dance video
10 दिवसापूर्वी अंबाजोगाई तालुक्यात दिवसाकाठी 250 हून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र ती संख्या आता 50 हून कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळेच मागील महिनाभरापासून रुग्णसेवेत वाहून घेतलेल्या या महिला डॉक्टरांनी थेट पीपीई किट असताना गाण्याच्या तालावर डान्स करून आनंद लुटला.
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर आणि तेथील सर्व स्टाफची चांगली तारांबळ उडाली. अनेक डॉक्टर आणि नर्स यांना अठरा-आठरा तास काम करावे लागत आहे. मात्र आता अंबेजोगाई येथील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहेत. 10 दिवसापूर्वी अंबाजोगाई तालुक्यात दिवसाकाठी 250 हून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र ती संख्या आता 50 हून कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळेच मागील महिनाभरापासून रुग्णसेवेत वाहून घेतलेल्या या महिला डॉक्टरांनी थेट पीपीई किट असताना गाण्याच्या तालावर डान्स करून आनंद लुटला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.