बीड - औरंगाबाद सिडको पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा या मागणीचे निवेदन तहसिलदार शारदा दळवी व पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी निवेदन देण्यात आले.
महेबुब शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या खोट्या गुन्ह्याचा जाहीर निषेध करत, हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर युवा नेते महेश आजबे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नाजीम शेख, डॉ सुनील पारखे, अशोक पोकळे, भाऊसाहेब घुले, डॉ. अशोक सरोदे, राजेंद्र जरांगे, ताराचंद कानडे, डॉ. संतोष काकडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.