महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीजवापराची तपासणी करण्यासाठी माझ्या घरी का आलास म्हणत वायरमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण - महावितरण विभागाबद्दल बातमी

महावितरण विभागाच्या वायरमनला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील दैठणा येथे घडली.

Wireman was beaten by a couple in Beed
वीजवापराची तपासणी करण्यासाठी माझ्या घरी का आलास म्हणत वायरमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण

By

Published : Dec 17, 2020, 5:23 PM IST

बीड -अनधिकृत वीजवापराची तपासणी करण्यासाठी माझ्या घरी काला आलास म्हणत वायरमनला मारहाण करून जिवे मारण्याची दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आष्टी तालुक्यातील दैठणा येथे गुरूवारी घडला.

महावितरण विभागाकडून सध्या तालुक्यात एक गाव एक दिवस योजनेअंतर्गत वीजदेयक थकबाकी वसुली सुरू आहे. वीजबील दुरुस्ती, नवीन वीजजोडणी, अनाधिकृत वीज वापराची तपासणी आदी कामे सुरू आहेत. या मोहिमेअंतर्गत गुरूवारी आष्टी तालुक्यातील दैठणा येथे बाबासाहेब लक्ष्मण पुणेकर व रंजनाबाई बाबासाहेब पुणेकर यांच्या घराची स्थळ तपासणी करण्यासाठी महावितरणचे वायरमन बाबुराव रामचंद्र पांढरे व इतर सहा कर्मचारी गेले असता वीजचोरी आढळून आली. पथकाने घराची तपासणी केल्याचा राग धरून बाबासाहेब लक्ष्मण पुणेकर व रंजनाबाई बाबासाहेब पुणेकर या दाम्पत्याने वायरमन बाबुराव पांढरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वायरमन बाबुराव पांढरे यांनी आष्टी पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details